हिंदूंना हिंदू राहायचं असेल, तर भारताला अखंड बनवावंच लागेल -मोहन भागवत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वावर जोर देत भारत आणि हिंदू वेगवेगळे नाहीत, असं म्हटलं आहे. ‘भारताला भारत म्हणून राहायचं असेल, तर भारताला हिंदू म्हणूनच राहावं लागेल. हिंदूंना हिंदू म्हणून राहायचं असेल, तर भारताला अखंड बनवावंच लागेल,’ असं भागवत यांनी एका कार्यक्रमात म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

मध्य प्रदेशातील ग्वालेर येथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी भारत-पाकिस्तान फाळणीकडे लक्ष वेधत अखंड भारताच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

1930 पासून देशात Muslim समाजाची लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न होतो आहे, RSS प्रमुख मोहन भागवत यांचं वक्तव्य

हे वाचलं का?

‘हा हिंदुस्तान आहे आणि इथे परंपरेनं हिंदूच राहत आले आहेत. ज्या-ज्या गोष्टीला हिंदू म्हणून संबोधलं जातं, त्या सगळ्यांच्या विकास या भूमीत झाला आहे. भारताच्या सर्व गोष्टी भारताच्या भूमीशी जोडलेल्या आहेत. हा योगायोग नाहीये,’ असं सरसंघचालक भागवत म्हणाले.

‘हिंदूंशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाही. भारत तुटला, पाकिस्तान निर्माण झाला. कारण आपण हिंदू आहोत हेच विसरुन गेलो. तेथील मुस्लीमही विसरून गेले. स्वतःला हिंदू समजणाऱ्यांची आधी शक्ती कमी झाली आणि नंतर संख्या. त्यामुळे पाकिस्तान भारत म्हणून राहिला नाही,’ असं मत भागवत यांनी यावेळी मांडलं.

ADVERTISEMENT

‘आता तर थेट सरकारच विरोध करु लागलंय’, मोहन भागवत ठाकरे सरकारवर बरसले

ADVERTISEMENT

ग्वालेर येथील कार्यक्रमापूर्वी नोएडामध्ये सरसंघचालक भागवत यांच्या हस्ते एका पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळीही भागवत यांनी फाळणीवर भाष्य केलं. भागवत म्हणाले, ‘फाळणी हा काही राजकीय मुद्दा नाही, तर मुळात हा अस्तित्वाचा मुद्दा आहे. रक्ताच्या नद्या वाहू नयेत म्हणूनच भारताच्या फाळणीचा प्रस्ताव स्वीकारला गेला. पण तेव्हापासून सगळं त्याच्या उलटच होत आहे. तेव्हापासून आतापर्यंत जास्त रक्त सांडलं गेलं आहे.’

Article 370 रद्द करूनही काश्मीर समस्या पूर्णपणे सुटली नाही, मोहन भागवत यांचं महत्त्वाचं वक्तव्य

‘भारताच्या फाळणीवर त्यावेळच्या परिस्थितीपेक्षाही इस्लाम आणि ब्रिटिश आक्रमकांच्या प्रभावातून झाली. असं असलं तरी गुरुनानकजींनी आपल्याला इस्लामी आक्रमकांबद्दल आधीच सावध केलं होतं. भारताच्या फाळणीमुळे कुणीही सुखी नाही. फाळणी समजून घ्यायची असेल, आपल्याला त्यावेळची परिस्थिती समजून घ्यावी लागेल,’ असं सरसंघचालक भागवत या कार्यक्रमात म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT