RSS ला भगवा झेंडा प्रिय, तिरंगा का नाही? मोहन भागवत यांनी दिलं उत्तर; म्हणाले…

मुंबई तक

भारत सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करतो आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. हर घर तिरंगा या मोहिमेलाही मोदी सरकारने सुरूवात केली आहे. तसंच What’s App च्या डीपीवरही तिरंगा ठेवण्यात यावा असंही आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन करूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) डीपी म्हणून तिरंगा ठेवला नाही. यानंतर संघाला […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भारत सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करतो आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. हर घर तिरंगा या मोहिमेलाही मोदी सरकारने सुरूवात केली आहे. तसंच What’s App च्या डीपीवरही तिरंगा ठेवण्यात यावा असंही आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन करूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) डीपी म्हणून तिरंगा ठेवला नाही. यानंतर संघाला तिरंग्याबाबत तिरस्कार आहे अशी टीका होऊ लागली. काँग्रेसचे नेते जवाहरलाल नेहरूंनी हाती तिरंगा घेतला आहे हा फोटो डीपी म्हणून ठेवत आहेत. तर संघावर टीका होऊ लागली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी याबाबत उत्तर दिलं आहे.

पुढील १५ वर्षात अखंड भारत पाहण्यास मिळेल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

संघ तिरंगा झेंड्याचा तिरस्कार करतो असा काँग्रेसचा आरोप

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने डीपी म्हणून ट्विटरवर तिरंगा ठेवलेला नाही. त्यांचं जे चिन्ह आहे तेच त्यांनी ठेवलं आहे. यावरून आता आरएसएसवर टीका होऊ लागली आहे. मात्र मोहन भागवत यांनी विषयीची भूमिका स्पष्ट केली. संघ तिरंगा झेंड्याचा तिरस्कार करतो हा आरोप काँग्रेसने केला आहे. अशात तिरंगा आणि संघाचं नातं काय? हे सरसंघालक मोहन भागवत यांनी सांगितलं आहे.

“प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधायचं?” मोहन भागवत यांचं ज्ञानवापीबाबत मोठं वक्तव्य

हे वाचलं का?

    follow whatsapp