डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा घसरला; पहिल्यांदाच पोहचला 83रुपयांच्या पार
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे. नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रुपया घसरत नसून डॉलर मजबूत होत असल्याचे विधान केले. यावर साधक-बाधक वादही झाले. आता बुधवारी रुपयाने विक्रमी नीचांकी पातळी गाठली. तो डॉलरच्या तुलनेत 61 पैशांनी घसरून 83.01 रुपये प्रति डॉलरवर थांबला आहे, जो आतापर्यंतचा नीचांक आहे. रुपया 83 च्या पुढे गेल्याची ही पहिलीच […]
ADVERTISEMENT

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे. नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रुपया घसरत नसून डॉलर मजबूत होत असल्याचे विधान केले. यावर साधक-बाधक वादही झाले. आता बुधवारी रुपयाने विक्रमी नीचांकी पातळी गाठली. तो डॉलरच्या तुलनेत 61 पैशांनी घसरून 83.01 रुपये प्रति डॉलरवर थांबला आहे, जो आतापर्यंतचा नीचांक आहे.
रुपया 83 च्या पुढे गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी रुपयामध्ये घसरण दिसून आली. डॉलरच्या तुलनेत तो 82.36 रुपये प्रति डॉलरवर बंद झाला. बुधवारी दुपारच्या व्यवहारात रुपयामध्ये थोडी सुधारणा दिसून आली, मात्र संध्याकाळपर्यंत त्यात घसरण सुरू झाली. व्यवहाराच्या शेवटी, तो डॉलरच्या तुलनेत खराब झाला आणि प्रति डॉलर 83 रुपये पार केल्यानंतर बंद झाला.
शेअर बाजारातही दिवसभर चढ-उतार सुरूच होते. पण व्यवसायाच्या अखेरीस ते एका धारने बंद झाले. बुधवारी बीएसई सेन्सेक्स 146.59 अंकांच्या वाढीसह 59,107.19 वर बंद झाला. त्याच वेळी, NSE निफ्टी देखील 25.30 अंकांच्या मजबूतीसह 17,521.25 वर थांबला.
निर्मला सीतारामन यांचे वक्तव्य