Russia Ukraine war : रशियाकडून युक्रेनमध्ये अंदाधूंद हवाई हल्ले; खेरसन शहर घेतलं ताब्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतासह अवघ्या जगाच्या नजरा सध्या युक्रेनवर खिळल्या आहेत. २४ फेब्रुवारी रोजी रशियाने केलेल्या आक्रमणानंतर युक्रेनची राजधानी कीव्ह युद्धभूमीचं केंद्र बनली आहे. गेल्या आठवडाभरापासून रशियन लष्कराकडून सुरू असलेल्या हल्ल्यांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, कीव्हमध्ये प्रचंड धुमश्चक्री सुरू आहेत. युक्रेनची मिलिटरी अकादमीवरही मिसाईल डागण्यात आलं असून, सध्या खार्किव्ह, कीव्हमध्ये दोन्हीकडील सैन्य एकमेकांशी झुंज देताना दिसत आहे.

जेवण आणायला गेला, परत आलाच नाही; नवीनचा मृत्यू नेमका कसा झाला?

कीव्हचा पाडाव करून सत्तांतर घडवून आणण्याचे रशियाची म्हणजेच पुतिन यांची योजना आहे. रशियाच्या संसदेकडून परवानगी मिळाल्यानंतर रशियाकडून विशेष लष्करी मोहीम असल्याचं सांगत युक्रेनवर आक्रमण केलं आणि अजूनही हल्ले सुरूच आहेत. रशियाच्या आक्रमणाला युक्रेनकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे.

अजूनही रशियन लष्कराला ताब्यात घेण्यात यश आलेलं नाही. दरम्यान, कीव्हवर रशिया मोठी चढाई करणार असल्याचं दिसत असून, एक ६४ किमी लांबी असलेला मोठा सैन्य ताफा कीव्हच्या दिशेनं येत आहे. प्रचंड नुकसान झालेलं असल्यानं ताफ्याची चाल संथ झाली आहे. सॅटेलाईटने टिपलेल्या छायाचित्रात हा ताफा दिसून आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

We are with you ! जगभरातून युक्रेनला मदतीचा ओघ वाढला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकी संसदेला संबोधित करताना युक्रेनच्या नागरिकांच्या लढाऊ बाण्याचं कौतूक केलं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हुकुमशाह म्हणत बायडन यांनी यांची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही दिला. आर्थिक निर्बंध लादलेल्या रशियासाठी अमेरिकनं हवाई हद्दही बंद केली. बायडन यांनी याची घोषणा केली.

लोकप्रिय आयफोन निर्माती कंपनी ‘अॅपल’नेही रशियाला मोठा झटका दिला आहे. अॅपलने आपल्या सर्व उत्पादनांची विक्री रशियात थांबवली आहे. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे आपण व्यथित असून, या हिंसेतील पीडितांसोबत उभं असल्याचं अॅपलने म्हटलं आहे. अॅपलने रशियात अॅपल मॅपसारख्या सेवाही मर्यादित केल्या आहे. अॅपलबरोबरच ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील कंपनी एक्सॉनमॉबिलने रशियातील काम बंद करण्याची तसेच गुंतवणूक थांबवण्याची घोषणा केली आहे.

ADVERTISEMENT

Russia Ukraine War : रशियाचा खार्किव्हमध्ये पुन्हा हल्ला; ८ नागरिक ठार

ADVERTISEMENT

आक्रमणाच्या सुरुवातीपासूनच रशियन लष्कराच्या रडारवर असलेल्या खार्किव्हमध्येही प्रचंड संघर्ष होताना दिसत आहे. खार्किव्ह ताब्यात घेण्यासाठी पॅराट्रूपर्सही उतरवले आहेत. खार्किव्ह आणि आजूबाजूच्या परिसरात धोक्याचा सायरन वाजवला गेल्यानंतर रशियाचे हल्ले सुरू झाले. युक्रेनमध्ये आतापर्यंत सर्वाधिक हिंसा खार्किव्हमध्येच झाल्याचं दिसत आहे.

बुधवारी खार्किव्ह शहरात पोलीस विभागाच्या इमारतीवरच मिसाईल हल्ला करण्यात आला. खार्किव्हच्या गव्हर्नरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रशियाकडून कऱण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात २१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ११२ जखमी झाले आहेत.

रशियाकडून युक्रेनमधील आणखी एका शहराला निशाणा बनवलं गेलं. युक्रेन परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहिती प्रमाणे कीव्हपासून पश्चिमेला असलेल्या झोटेमरमध्ये रशियाकडून मिसाईल हल्ला करण्यात आला. प्रसुती गृहावरच हल्ला करण्यात आलेला असून, ज्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला. हल्ल्याचा व्हिडीओ ट्विट करत हा नरसंहार नाही, तर मग काय आहे? असं युक्रेननं म्हटलं आहे.

रशियन लष्कराने युक्रेनमधील खेरसन शहरावर कब्जा मिळवला असल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. रशियन सैनिक खेरसन शहरातील रस्त्यावर दिसून आले होते. खेरसनच्या महापौरांनी सांगितलं की, रेल्वे स्टेशन आणि बंदरावर रशियन सैनिकांनी कब्जा केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT