रशियाच्या हल्ल्यांमुळे युरोपातील सर्वात मोठ्या अणु ऊर्जा प्रकल्पाला आग; युक्रेननं दिला इशारा
रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज नववा दिवस आहे. दोन्ही देश चर्चा करत असले, तरीही संघर्ष थांबलेला नाही. दिवसेंदिवस युक्रेनमधील स्थिती बिकट होत चालली असून, रशियाकडून होत असलेल्या हल्ल्यांनी युक्रेनमध्ये प्रचंड विध्वंस होत आहे. याच दरम्यान, आता रशियाच्या हल्ल्यांमुळे युरोपातील सर्वात मोठ्या अणुभट्टीजवळ आग लागल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेननं आगीची माहिती देतानाच स्फोट झाला, तर चर्नोबिलपेक्षा […]
ADVERTISEMENT

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज नववा दिवस आहे. दोन्ही देश चर्चा करत असले, तरीही संघर्ष थांबलेला नाही. दिवसेंदिवस युक्रेनमधील स्थिती बिकट होत चालली असून, रशियाकडून होत असलेल्या हल्ल्यांनी युक्रेनमध्ये प्रचंड विध्वंस होत आहे. याच दरम्यान, आता रशियाच्या हल्ल्यांमुळे युरोपातील सर्वात मोठ्या अणुभट्टीजवळ आग लागल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेननं आगीची माहिती देतानाच स्फोट झाला, तर चर्नोबिलपेक्षा १० पट अधिक तीव्रतेचा असेल, अशी भीती व्यक्त केली आहे.
इनरडोहार शहरानजीक असलेल्या झोपोरिझिया येथे युरोपातील सर्वात मोठा अणु ऊर्जा प्रकल्प असून, रशियाच्या हल्ल्यांमुळे प्रकल्पा धोका निर्माण झाला आहे. रशियाकडून चारही बाजूंनी हल्ले केले जात आहे. त्यामुळे अणु ऊर्जा प्रकल्पात आग लागल्याची माहिती युक्रेनकडून देण्यात आली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दिमीर झेलेन्स्की यांच्या कार्यालयाचे प्रमुख सल्लागारांनी आग याबद्दलचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांचं ट्विट युक्रेनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही रिट्विट केलं आहे.
Zaporizhzhia NPP is under fire! The entire Europe is at risk of a repeat of the nuclear catastrophe. Russians must stop fire! pic.twitter.com/P46YxKZZ0W
— Михайло Подоляк (@Podolyak_M) March 4, 2022
रशियाने भारताच्या विनंतीवरून सहा तास युद्ध थांबवलं?; सत्य नेमकं काय?
झापोरिझिया न्युक्लिअर पावर प्लांट आगीत सापडला आहे. संपूर्ण युरोपला आण्विक आपत्तीची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे. रशियाने गोळीबार थांबवायला हवा, असं हा व्हिडीओ ट्विट करताना सांगण्यात आलं आहे.