तातडीने खार्किव्हमधून बाहेर पडा, भारतीय नागरिकांना सूचना; मिसाईल हल्ला होणार
रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धाचा आजचा सातवा दिवस आहे. अशात परराष्ट्र मंत्रालयाने एक अॅडव्हायजरी लागू केली आहे. ज्यानुसार खार्किव्हमधून सर्व भारतीयांना हे शहर सोडण्यास सांगितलं आहे. असाल तसे खार्किव्हमधून बाहेर पडा असं सांगण्यात आलं आहे. आज तकच्या बातमीनुसार ही अॅडव्हायजरी लागू केल्यानंतर एक क्रूज मिसाईल सिटी कौन्सिलच्या इमारतीवर आदळलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी संध्याकाळीच यासंदर्भातली […]
ADVERTISEMENT
रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धाचा आजचा सातवा दिवस आहे. अशात परराष्ट्र मंत्रालयाने एक अॅडव्हायजरी लागू केली आहे. ज्यानुसार खार्किव्हमधून सर्व भारतीयांना हे शहर सोडण्यास सांगितलं आहे. असाल तसे खार्किव्हमधून बाहेर पडा असं सांगण्यात आलं आहे. आज तकच्या बातमीनुसार ही अॅडव्हायजरी लागू केल्यानंतर एक क्रूज मिसाईल सिटी कौन्सिलच्या इमारतीवर आदळलं आहे.
ADVERTISEMENT
परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी संध्याकाळीच यासंदर्भातली अॅडव्हायजरी लागू केली आहे. खार्किव्हमध्ये बिकट परिस्थिती आहे. जे भारतीय विद्यार्थी, नागरिक या शहरात अडकले आहेत त्यांनी तातडीने हे शहर सोडावं असे निर्देश देण्यात आले आहेत. एवढंच नाही भारतीय नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी खार्किव्ह सोडलं पाहिजे असंही यात नमूद करण्यात आलं आहे. Pesochin, Baybaye आणि Bezlyudovka च्या दिशेने पुढे जा असंही सांगण्यात आलं आहे.
हे वाचलं का?
खार्किव्ह हे युक्रेनमधलं एक मोठं शहर आहे. रशियन सैन्याकडून या शहरावर सातत्याने हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यूही झाला आहे. नवीन असं त्या विद्यार्थ्याचं नाव होतं तो कर्नाटकचा राहणारा होता. याआधी भारतीय दुतावासाने भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अॅडव्हायजरी जारी केली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना तिथून एअरलिफ्ट करण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगाही सुरू केलं आहे.
परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी सांगितलं आहे की आम्ही जेव्हा पहिली अॅडव्हायजरी लागू केली होती तेव्हा युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय विद्यार्थी होते. त्यापैकी आत्तापर्यंत 12 हजार विद्यार्थ्यांनी युक्रेन सोडलं आहे. आठ हजार विद्यार्थी खार्किव्ह आणि सूमीमध्ये आहे. अनेक विद्यार्थी युक्रेनच्या पश्चिमी सीमेपर्यंत पोहचले आहेत किंवा त्या दिशेने जात आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बुधवारी खार्किव्ह शहरात पोलीस विभागाच्या इमारतीवरच मिसाईल हल्ला करण्यात आला. खार्किव्हच्या गव्हर्नरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रशियाकडून कऱण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात २१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ११२ जखमी झाले आहेत.
रशियाकडून युक्रेनमधील आणखी एका शहराला निशाणा बनवलं गेलं. युक्रेन परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहिती प्रमाणे कीव्हपासून पश्चिमेला असलेल्या झोटेमरमध्ये रशियाकडून मिसाईल हल्ला करण्यात आला. प्रसुती गृहावरच हल्ला करण्यात आलेला असून, ज्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला. हल्ल्याचा व्हिडीओ ट्विट करत हा नरसंहार नाही, तर मग काय आहे? असं युक्रेननं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT