Russia-Ukraine War : युद्धाची किंमत मोजावी लागेल; बायडन यांचा पुतिन यांना इशारा

मुंबई तक

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी आज अमेरिकन संसदेला संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युद्धाच्या निर्णयावर जोरदार टीकास्त्र डागलं. अप्रत्यक्षपणे पुतिन यांचा उल्लेख हुकुमशाह असा करत जोपर्यंत किंमत चुकवावी लागणार नाही, तोपर्यंत अराजक निर्माण करत राहतील, असं बायडन म्हणाले. अमेरिकन संसदेला संबोधित करताना अध्यक्ष बायडन यांनी सुरुवातीलाच रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाबद्दल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी आज अमेरिकन संसदेला संबोधित केलं. यावेळी बोलताना त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युद्धाच्या निर्णयावर जोरदार टीकास्त्र डागलं. अप्रत्यक्षपणे पुतिन यांचा उल्लेख हुकुमशाह असा करत जोपर्यंत किंमत चुकवावी लागणार नाही, तोपर्यंत अराजक निर्माण करत राहतील, असं बायडन म्हणाले.

अमेरिकन संसदेला संबोधित करताना अध्यक्ष बायडन यांनी सुरुवातीलाच रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाबद्दल भूमिका मांडली. युक्रेनवर लादलेल्या युद्धाबद्दल बायडन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर टीका केली. तर युक्रेनच्या नागरिकांच्या लढाऊ बाण्याचं कौतूक करत युक्रेनच्या पाठिशी ठामपणे उभं असल्याचं आश्वासन दिलं.

अध्यक्ष बायडन म्हणाले,”पुतिन यांनी युद्ध रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते, मात्र त्यांनी तसं केलं नाही. पुतिन यांना वाटत होतं की पश्चिमेकडील देश आणि नाटो प्रत्युत्तर देणार नाही. आमच्यामध्ये फूट पडेल, असं त्यांना वाटतं होतं, पण पुतिन चुकले. आम्ही तयार आहोत.”

संसदेला संबोधित करताना बायडन म्हणाले, “जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा पुतिन यांच्याकडून युक्रेनविरुद्ध पुकारण्यात आलेल्या युद्धामुळे रशिया कुमकुवत होईल आणि जगातील इतर देशांना शक्तिशाली बनवेल. इतिहासातून आपण हेच शिकलो आहोत की, जोपर्यंत हुकुमशाहाला त्याच्या आक्रमणाची किंमत चुकावी लागत नाही, तोपर्यंत तो जास्त अराजकता निर्माण करतो.”

हे वाचलं का?