Russia-Ukraine : रशियाच्या चार अटी काय, ज्या युक्रेननं मान्य केल्यास युद्ध तत्काळ थांबणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर सुरू झालेल्या युद्धाचा भडका अजूनही कायम आहे. दोन्ही देशातील लष्करी संघर्ष सुरू होऊन १२ दिवस झाले आहेत. दोन्ही देशात चर्चा सुरू असली, तरी युद्ध थांबण्याचे दिशेनं अद्याप तरी कोणतंही पाऊल पडलेलं नाही. दरम्यान रशियाने आता युक्रेनसमोर चार अटी ठेवल्या असून, त्या मान्य केल्यास तत्काळ युद्ध थांबवू, असं म्हटलं आहे.

युक्रेनच्या माध्यमांनी असं म्हटलं आहे की, रशियाने आता युक्रेनसमोर चार अटी ठेवल्या आहेत. या चार अटी युक्रेनने मान्य केल्यास रशियाकडून सुरू असलेली लष्करी कारवाई तत्काळ थांबवली जाईल.

रशियाने नेमक्या काय अटी ठेवल्या आहेत?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

१) रशिया सरकारने युक्रेनसमोर ठेवलेल्या चार अटींपैकी पहिली अट अशी आहे की, युक्रेननं तत्काळ लष्करी कारवाई थांबवावी. ‘क्रेमलिन’च्या एका प्रवक्त्याने म्हटलं आहे की, “आम्ही युक्रेनमधील लष्करी कारवाई थांबवू, पण त्यासाठी युक्रेनच्या लष्कराला रशियाविरोधातील कारवाई बंद करावी लागेल. युक्रेननं असं केलं तर आम्ही कुणावरही गोळी चालवणार नाही.”

‘रशियन सैनिक महिलांवर बलात्कार करत आहेत’, युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा खळबळजनक आरोप

ADVERTISEMENT

२) रशियाने दुसरी अट युक्रेनच्या संविधानात बदल करण्याची मागणी केली आहे. युक्रेनचा युरोपीय संघ आणि नाटोमध्ये सहभागी होण्याकडे कल आहे. मात्र, रशियाने याला विरोध केला आहे. युक्रेन कोणत्याही संघटनेत सहभागी होणार नाही, असा बदल सरकारने युक्रेनच्या संविधानात करावा, असं रशियाने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

३) रशियाने युक्रेनसमोर तिसरी अट ठेवली आहे, ती क्रिमिआची. क्रिमिआ रशियाचा भाग असल्याची मान्यता युक्रेननं द्यावी. क्रिमिआ रशियाचाच भाग होता. १९५४मध्ये सोव्हिएत संघाचे नेते निकिता ख्रुश्चेव यांनी हा प्रांत युक्रेनला दिला होता. २०१४मध्ये रशियाने हा प्रांत परत ताब्यात घेतला होता.

रशियाने भारताच्या विनंतीवरून सहा तास युद्ध थांबवलं?; सत्य नेमकं काय?

४) डोनेत्स्क आणि लुहान्स्क यांना रशियाने स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं आहे. युक्रेननेही या दोन्ही प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी केली असून, या अटी मान्य केल्या, तर तत्काळ लष्करी कारवाई थांबवू असं रशियाने म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT