Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी केंद्र सरकारने जारी केले हेल्पलाइन क्रमांक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Russia-Ukraine War Updates: अनेक दिवसांपासून ज्याची भीती होती, अखेर तेच घडले. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले आहे. रशियाने गुरुवारी पहाटे युक्रेनवर लष्करी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर युक्रेनमध्ये आतापर्यंतचा मोठा विध्वंस पाहायला मिळत आहे. युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थीही अडकले आहेत. ज्यांना गेल्या काही दिवसांपासून एअरलिफ्ट केले जात होते. आताही केंद्र सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी एक अॅडव्हायजरी जारी केली आहे.

युक्रेनमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना सांगितले आहे की, युक्रेनमधील सध्याची परिस्थिती अनिश्चित स्वरुपाची आहे. तुम्ही आता जिथे कुठे आहात तिथे शांततेत आणि सुरक्षितत राहा. मग ते तुमचे घर असो, वसतिगृह असो किंवा इतर कुठेही. युक्रेनची राजधानी कीवमधील भारतीय दूतावासाने अॅडव्हायजरी जारी करताना सांगितले की, ‘जो कोणी कीवला जात आहे, त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ शहरात परत जाण्याची सूचना केली जात आहे. याशिवाय इतर माहितीसाठी पुढील सूचना लवकरच जारी केल्या जातील.’

कीवमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे विशेष उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांनी दूतावासाच्या वेबसाइट, सोशल मीडिया पोस्ट आणि नंबरवर संपर्क साधावा.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यासोबतच युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी सरकारने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. हे टोल फ्री क्रमांक आहेत ज्याद्वारे सद्यस्थितीबद्दल अधिक माहिती मिळू शकते.

हेल्पलाइन क्रमांक

ADVERTISEMENT

+38 0997300428

ADVERTISEMENT

+38 0997300483

+38 0933980327

+38 0635917881

+38 0935046170

युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यामुळे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. या कारणास्तव, एअर इंडियाचे भारतातून युक्रेनला जाणारे विशेष विमान हे कोणालाही न घेता गुरुवारी नवी दिल्लीला परतले. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, एअर इंडियाचे विशेष विमान AI-1947 कीव आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जात होते. पण त्यावेळी त्यांना नोटिस टू एयर मिशन्स मिळाली. त्यामुळे हे विमान माघारी फिरलं.

त्याच वेळी, आज सकाळी युक्रेन इंटरनॅशनल एअरलाइन्स (UIA) चे एक विशेष विमान दिल्ली विमानतळावर उतरले. ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांसह एकूण 182 भारतीय नागरिक होते. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या सर्वांना भारतात परत आणण्यात आले आहे.

युक्रेनमध्ये अडकलेले 200 हून जास्त भारतीय मायदेशी परतले

तत्पूर्वी, भारत सरकारने गुरुवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) ला सांगितले की ते संकटग्रस्त युक्रेनमधून 20,000 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना परत येण्यास गती देत ​​आहेत. UNSC मधील भारताचे स्थायी प्रतिनिधी TS तिरुमूर्ती म्हणाले, ‘आम्ही 20,000 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना युक्रेनमध्ये परत जाण्याची सुविधा प्रदान करत आहोत.’

तिरुमूर्ती यांनी UNSC ला असेही सांगितले की, भारताने तत्काळ डी-एस्केलेशनची मागणी केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT