Russian Luna 25 Crash : रशियाच्या ‘मिशन मून’ला! चंद्रावर उतरण्यापूर्वी लँडर कोसळलं
russian luna 25 suffers emergency situation : रशियाच्या चंद्र मोहिमेला झटका. लुना 25 यान चंद्रापासून काही अंतरावर असतानाच कोसळलं. मानवरहित यानात तांत्रिक बिघाड झाल्याने दुर्घटना.
ADVERTISEMENT
Russian luna 25 news : रशियाच्या अवकाशातील चंद्र या मोहिमेला जबर धक्का बसला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाचे लुना-25 हे यान अनियंत्रित कक्षेत फिरल्यानंतर चंद्रावर कोसळले. याआधी शनिवारी रशियाच्या मून-मिशन लुना-25 मध्ये लँडिंगपूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची बातमी आली होती. लुना 25 हे 21 ऑगस्ट रोजी चंद्राला स्पर्श करणार होते. (Russia’s Luna-25 crashed before landing on the moon)
ADVERTISEMENT
मानवरहित अंतराळयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार होते, परंतु प्री-लँडिंग कक्षेत प्रवेश करताना काही समस्या आली आणि ते क्रॅश झाले. हे यान चंद्राच्या एका भागाचा अभ्यास करण्याच्या मोहिमेचा एक भाग होतं. हे यान सोमवारी (21 ऑगस्ट) जमिनीवर उतरणार होते. चंद्रावर गोठलेले पाणी आणि इतर काही मौल्यवान घटकांचा शोध हे यान घेईल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता.
आपतकालीन स्थिती
रशियन स्पेस एजन्सी, Roscosmos ने सांगितले आहे की Luna-25 अंतराळ यानाला चंद्रावर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करावा लागला. यानाला ज्या समस्या आल्या त्याचं विश्लेषण आता टीम करत आहेत. व्यवस्थापन टीम सध्या परिस्थितीचे विश्लेषण करत आहे, असे एका निवेदनात म्हटले आहे. भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेपूर्वी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर लँडिंगच्या प्रयत्नावर रोसकॉसमॉसने अद्याप काहीही सांगितले नाही.
हे वाचलं का?
वाचा >> Chandrayaan3 चंद्राच्या उंबरठ्यावर! विक्रम लँडर-प्रोपल्शन मॉड्यूल कसं करणार काम?
रशियन स्पेस एजन्सीची कक्षा बदलण्याची निश्चित योजना होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, Luna-25 मध्ये एक ऑनबोर्ड संगणक बसवला आहे. जो आपोआप त्याचा मार्ग म्हणजेच कक्षा निवडतो. त्याला कोणत्या उंचीवर जायचे आहे, ते तो शोधून काढतो. हे त्याच प्रकारे कार्य करते. पण या स्वयंचलित ऑनबोर्ड संगणकावर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. काही तांत्रिक बिघाडामुळे हे घडलं असून, त्याचं विश्लेषण आता केलं जात आहे. दुरुस्त करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर जाऊन काम करू शकत नाही. त्याला वेळ लागेल, असे रशियन स्पेस एजन्सीने म्हटले आहे.
वाचा >> Chandrayaan 3 : चांद्रयानचे होणार दोन तुकडे! कसा असणार पुढील प्रवास?
Luna-25 या आठवड्याच्या सुरुवातीला पोहोचले होते चंद्राच्या कक्षेत
11 ऑगस्ट रोजी रशियन सुदूर पूर्वेतील व्होस्टोचनी कॉस्मोड्रोम येथून लुना-25 यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले होते. स्पेसपोर्ट हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि रशियाला अंतराळात महासत्ता बनविण्याच्या आणि कझाकस्तानमधील बायकोनूर कॉस्मोड्रोममधून रशियन प्रक्षेपण हलवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा हा भाग असल्याचे म्हटलं जात आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर ते चंद्राभोवती फिरत होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT