“तिथेच या हराम**** राजकीय चिता पेटेल, हीच बाळासाहेबांना आदरांजली” -सेना
Saamana editorial on balasaheb Thackeray Birth Anniversary : “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी (Maharashtra CM) कबुलीच दिली, ‘आमचे नाते मोदींशी! (Narendra modi) ’ मग बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) नाव का घेता व विधानसभेत शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्र अनावरणाचे जे ढोंग रचले गेले आहे ते कशासाठी?”, असा सवाल करत शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) शिंदे गटावर (Shinde […]
ADVERTISEMENT
Saamana editorial on balasaheb Thackeray Birth Anniversary : “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी (Maharashtra CM) कबुलीच दिली, ‘आमचे नाते मोदींशी! (Narendra modi) ’ मग बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) नाव का घेता व विधानसभेत शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्र अनावरणाचे जे ढोंग रचले गेले आहे ते कशासाठी?”, असा सवाल करत शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) शिंदे गटावर (Shinde Faction) टीकेची तोफ डागली.
ADVERTISEMENT
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी लिहिण्यात आलेल्या सामनातल्या अग्रलेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) थेट हल्ला चढवला.
“सध्या महाराष्ट्रात एक भलतेच राजकारण सुरू झाले आहे. त्यात शिवसेनाप्रमुखांची चोरी करण्याचा विषय प्रामुख्याने आहे, पण या चोरीमारीस देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री वगैरे लोकांनी हातभार लावावा याचे आश्चर्य वाटते”, असं म्हणत शिवसेनेनं मोदी आणि अमित शाहांना लक्ष्य केलंय.
हे वाचलं का?
Thackeray यांचा प्लॅन, कदम पिता-पुत्रांना धक्का? बड्या नेत्याची घरवापसी?
अग्रलेखातही पुढे असंही म्हटलेलं आहे की, “गेल्या पाचेक महिन्यांत महाराष्ट्रात ढोंगबाजीने कहर केला आहे. शिवसेनेचे मुखवटे लावून काही मंबाजी सत्तेत घुसले व त्यांनी मंदिरातून देव चोरावेत तसे शिवसेनाप्रमुख चोरण्याचा प्रयत्न केला. पुन्हा या चोरीत कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी चोरांना पाठबळ व कवच देण्याचे काम देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री करताना दिसत आहेत.”
ADVERTISEMENT
उपमुख्यमंत्र्यांनी खरी जागा दाखवली, शिंदेंचा उल्लेख कोल्हा… अग्रलेखात काय?
“मोदी यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर फक्त भाजपचाच बोलबाला होता. स्वतःस शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणवून घेणाऱ्यांना मोदींच्या समोरच भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची खरी जागा कशी दाखवली याचे चित्रीकरण समोर आले. भाजपने एक पेंढा भरलेला कोल्हा खुर्चीवर बसवला आहे व त्या कोल्हय़ास काडीमात्र किंमत नाही. शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्याने व्यासपीठावर जो अपमान सहन केला, अशांना बाळासाहेबांचे कटआऊट वगैरे लावून ढोंगबाजीचे प्रदर्शन करण्याची गरज नाही”, असं टीकास्त्र शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एकनाथ शिंदे यांच्यावर डागलं आहे.
ADVERTISEMENT
PM Modi: बाळासाहेबांच्या आवडीचा चाफा हार CM शिंदेनी घातला PM मोदींना!
शिवसेनेला खतम करण्याचं भाजप व हस्तकांचं कारस्थान -शिवसेना
शिवसेनेतील फुटीला शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा एकदा भाजपला जबाबदार धरलं आहे. “लाचारी व गुलामीची हद्द पार करीत त्यांनी भाजपच्या व्यासपीठावरूनच जाहीर केले, ‘‘होय, होय, आम्ही मोदींची म्हणजे मोदींची माणसं आहोत?’’ इतके सर्व स्पष्ट झाल्यावर लोकांना कळलेच असेल की, शिवसेना खतम करण्याचे किती मोठे कारस्थान भाजप व त्यांच्या हस्तकांनी रचले होते”, असं शिवसेनेनं (UBT) म्हटलं आहे.
मंबाजीचे मुख्यमंत्रीपद औटघटकेचे; शिंदेंवर टीकेचे बाण
शिवसेनेनं (UBT) पुढे असंही म्हटलंय की, “मंबाजीचे मुख्यमंत्रीपद औटघटकेचे आहे व उद्याचे भविष्य शिवसेनेचे आहे या विचाराचा निर्धार आजच्या दिवशी करणे गरजेचे आहे. मंबाजीने बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगितला, पण आपला बाप व पाठीराखा दुसराच कोणी असल्याचा दावा त्यांनी परदेशात केला.”
भास्कर जाधवांविरुद्ध शिंदे-कदमांनी डाव टाकला, 2024 साठी उमेदवार ठरला!
“मोदींसमोर गुडघे टेकून सांगितले, ‘आम्ही शिवसैनिक होतो हे ढोंग होते. वाघांच्या झुंडीत शिरलेली आम्ही मेंढरं आणि कोल्हे होतो. आम्ही वाघाचे कातडे पांघरून तेथे होतो, पण ईडी वगैरे लोकांनी आमचे कातडे ओढून काढले. त्यामुळे साहेब आम्ही तुमचेच!’ अशी कबुलीच दिल्याने शिवसेनेचा बाप कोण? हा प्रश्नच निकाली लागला,” अशा शब्दात शिवसेनेनं (UBT) शिंदेंवर हल्ला चढवला.
“बाळासाहेबांच्या जन्मदिनी गंगेच्या प्रवाहातील ओंडके आपोआप दूर झाले व काशीच्या हरिश्चंद्र घाटावर पोहोचले. त्या घाटावर हराम*** राजकीय चिता पेटेल हीच बाळासाहेबांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र आदरांजली”, असं म्हणत शिवसेनेकडून (UBT) बाळासाहेब ठाकरे यांना जयंती दिनी अभिवादन करण्यात आलंय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT