सचिन वाझेंचे मालक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत बसले आहेत-फडणवीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणामुळे झाली आहे तेवढी दुसऱ्या कोणत्याही प्रकरणाने झालेली नाही. नवाब मलिक हे का चिंतेत आहेत ते मला व्यवस्थित माहित आहे कारण त्यामुळे सत्तेत असणाऱ्या अनेकांचं बिंग फुटतंय. मी केंद्रीय गृह सचिवांना जे पत्र दिलं आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांना चिंता वाटू लागली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये म्हटलं आहे. ज्या रिपोर्टमुळे महाराष्ट्र पोलिसांची बदनामी झाली तो रिपोर्ट तर नवाब मलिक यांनीच पत्रकारांना दिला. मी तर फक्त कव्हरिंग लेटर दिलं होतं. सर्वात जास्त बदनामी झाली आहे ती वाझे प्रकरणामुळेच आणि सत्तेत बसलेल्या त्यांच्या मालकांना आता चिंता वाटू लागली आहे.

ADVERTISEMENT

सचिन वाझे ते परमबीर सिंग प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शांत का?

आणखी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

हे वाचलं का?

महाराष्ट्राची जेवढी बदनामी वाझे प्रकरणामुळे झाली आहे तेवढी कोणत्याही प्रकरणामुळे झालेले नाही. फोन टॅपिंगचा जो रिपोर्ट जो मी केंद्राकडे सोपवला आहे त्यामुळे अनेकांचं बिंग फुटणार आहे. महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करणारा रिपोर्ट नवाब मलिक यांनीच फोडला आहे. माझा प्रश्न असा आहे की सिंडिकेट राज चालवल्याने, बदल्यांमध्ये पैसे घेतल्याने आणि वाझेसारख्या लोकांना सेवेत घेतल्याने महाराष्ट्र पोलीस बदनाम झाले की त्यांचं नाव झालं? वाझेंचे मालक आता अहवाल NIA कडे गेल्याने चिंतेत आहेत.

बनावट आधारकार्ड दाखवून मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहत होते सचिन वाझे!

ADVERTISEMENT

काय आहे सचिन वाझे प्रकरण?

ADVERTISEMENT

२५ फेब्रुवारीला मुकेश अंबांनी यांच्या अँटेलिया या निवासस्थानासमोर एक स्कॉर्पिओ कार आढळली या कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या होत्या. सुरूवातीला हा सगळा प्रकार घातपाताचा आहे असं वाटलं होतं मात्र या प्रकरणात समोर आलं ते सचिन वाझे यांचं नाव. अँटेलिया प्रकरणात नाव समोर आलं ते सचिन वाझे यांचं. अँटेलियाच्या समोर जी स्कॉर्पिओ ठेवण्यात आली होती त्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचे आणि सचिन वाझेंचे व्यावसायिक संबंध होते. मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने जो जबाब दिला त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की मनसुख हिरेन यांचा मृत्यू ही हत्या आहे, ही हत्या सचिन वाझेंनी केल्याचा संशय मला आहे.

विमला हिरेन यांनी जो संशय व्यक्त केला त्यावरूनही देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत चांगलेच आक्रमक झाले होते. अधिवेशन गाजलं ते याच मुद्द्यावर. सचिन वाझे यांना १३ मार्चला एनआयएने अटक केली. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसकडे तर अँटेलिया स्फोटक प्रकरणाचा तपास हा एनआयएकडे सोपवण्यात आला होता. आता दोन्ही तपास NIA कडेच सोपवण्यात आले आहेत. एनआयने या प्रकरणी सचिन वाझेंची कसून चौकशी सुरू केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT