NIAची मुंबईत मोठी कारवाई! दाऊद इब्राहीमचा राईट हॅण्ड छोटा शकीलच्या मेहुण्याला अटक
दहशतवादी विरोधी केंद्रीय एजन्सी असलेल्या एनआयएने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. एनआयएने दाऊद इब्राहीमचा राईट हॅण्ड असलेल्या छोटा शकीलच्या मेहुण्याला अटक केली आहे. सलीम कुरेशी असं एनआयएने अटक केलेल्या व्यक्तीचं नाव सलीम कुरेशी असं आहे. सलीम कुरेशी हा डी-गँगमधील छोटा शकीलचा मेहुणा असून, त्याला सलीम फ्रूट म्हणूनही ओळखलं जातं. सलीम कुरेशी याला एनआयएने याच वर्षी […]
ADVERTISEMENT
दहशतवादी विरोधी केंद्रीय एजन्सी असलेल्या एनआयएने मुंबईत मोठी कारवाई केली आहे. एनआयएने दाऊद इब्राहीमचा राईट हॅण्ड असलेल्या छोटा शकीलच्या मेहुण्याला अटक केली आहे. सलीम कुरेशी असं एनआयएने अटक केलेल्या व्यक्तीचं नाव सलीम कुरेशी असं आहे.
ADVERTISEMENT
सलीम कुरेशी हा डी-गँगमधील छोटा शकीलचा मेहुणा असून, त्याला सलीम फ्रूट म्हणूनही ओळखलं जातं. सलीम कुरेशी याला एनआयएने याच वर्षी मे महिन्यात ताब्यात घेतलं होतं. फरार गँगस्टर दाऊद इब्राहीम याच्या मुंबई आणि ठाण्यातील २० ठिकाणांवर एनआयएने धाडी टाकल्या होत्या.
या धाडीनंतर एनआयएने सलीम कुरेशीला ताब्यात घेतलं होतं. केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत त्यांची चौकशीही करण्यात आली होती. एनआयएने दाऊद इब्राहीम, छोटा शकील आणि त्याच्या जवळच्या गँगस्टर्सवर गुन्हा दाखल केलेला आहे.
हे वाचलं का?
“दाऊद इब्राहिम पाकिस्तानातल्या कराचीत” भाचा अलीशाहने दिली माहिती
दाऊद इब्राहीम आणि छोटा शकीलविरुद्ध कोणत्या प्रकरणात गुन्हा?
एनआयएने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये दाऊद इब्राहीम, छोटा शकील आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींविरुद्ध मोठा आरोप केलेला आहे. एफआयआरनुसार दाऊद इब्राहीमने पाकिस्तानातून भारतात दहशतवादी हल्ले करण्याचा कट रचला होता.
ADVERTISEMENT
भारतात हल्ले करायचे आणि राजकीय नेत्यांना निशाणा बनवण्याचं काम दाऊदने तयार केलेल्या गटाकडे होतं. यातून भारतात दंगली भडकावण्याचं षडयंत्र दाऊद इब्राहीम आणि छोटा शकीलने पाकिस्तानातून रचलं होतं, असं या एफआयआरमध्ये म्हटलेलं आहे.
ADVERTISEMENT
नवाब मलिकांच्या प्रकरणात ईडीने घेतलं सलीम फ्रूटचं नाव
मनी लाँडरिंग प्रकरणात अटकेत असलेल्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या प्रकरणातही दाऊद इब्राहीम, छोटा शकील, सलीम फ्रूट यांची नाव घेण्यात आलेली आहेत. नवाब मलिकांना अटक केल्यानंतर ईडीने कोठडी वाढवून देण्याची मागणी करताना न्यायालयात युक्तिवादावेळी सलीम फ्रूट या नावाचा उल्लेख केला होता.
ईडीने नवाब मलिकांवर अंडरवर्ल्ड सोबत संबंध असल्याचा आणि टेरर फंडिंगचा आरोप लावलेला आहे. ईडीने न्यायालयाला सांगितलं होतं की, मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आणि मलिक यांच्यात अनेक मालमत्तेचे व्यवहार झाले आहेत आणि त्यामुळे त्यांची चौकशी करणं आवश्यक आहे. त्यांच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे होऊ शकतात, असं ईडीने न्यायालयात म्हटलं होतं.
दाऊद, शकील, सलीम फ्रूट… नवाब मलिकांच्या केसमध्ये अंडरवर्ल्डची एंट्री; काय आहे नेमकं प्रकरण?
ईडीने त्यावेळी न्यायालयात दिलेल्या माहितीप्रमाणे सलीम फ्रूटने चौकशीदरम्यान सांगितलं होतं, तो छोटा शकीलचा मेहुणा आहे. शकील आपल्या गुंडांच्या माध्यमातून खंडणीचे रॅकेट चालवतो. छोटा शकील पाकिस्तानातून दाऊद इब्राहिमसाठी काम करतो. पाकिस्तानात 34 वेळा छोटा शकीलच्या घरी गेल्याचंही त्याने सांगितलं. सलीम फ्रूटला 2006 मध्ये UAE मधून भारतात हद्दपार करण्यात आले होते आणि 2010 पासून तो तुरुंगात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT