माझ्याशी लग्न करशील ? सोमी अलीच्या प्रश्नाला सलमानने दिलं होतं ‘हे’ उत्तर
बॉलिवूड अॅक्ट्रेस सोमी अलीने सलमान खान सोबत एकेकाळी असलेल्या नात्याबद्दल पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. या दोघांचं लग्न झालं आहे अशा बातम्या त्या काळात म्हणजेच नव्वदच्या दशकात बऱ्याच प्रमाणात चर्चेत होत्या. गॉसिपिंगही मोठ्या प्रमाणात चालत होतं तोच हा काळ होता. मात्र सलमान खान आणि सोमी अलीचं लग्नापर्यंत आलेलं प्रेमप्रकरण अखेर संपुष्टात आलं आणि सोमी अली […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड अॅक्ट्रेस सोमी अलीने सलमान खान सोबत एकेकाळी असलेल्या नात्याबद्दल पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. या दोघांचं लग्न झालं आहे अशा बातम्या त्या काळात म्हणजेच नव्वदच्या दशकात बऱ्याच प्रमाणात चर्चेत होत्या. गॉसिपिंगही मोठ्या प्रमाणात चालत होतं तोच हा काळ होता. मात्र सलमान खान आणि सोमी अलीचं लग्नापर्यंत आलेलं प्रेमप्रकरण अखेर संपुष्टात आलं आणि सोमी अली देश सोडून निघून गेली. ती नेमकी का निघून गेली? काय घडलं होतं याचं उत्तर आता सोमी अलीने दिलं आहे.
सलमानला लग्नाबद्दल विचारलं होतं सोमी अलीने
सोमी अलीने एका मुलाखतीत सांगितलं की तो असा काळ होता ज्यावेळी मी सलमानवर फिदा झाली होती. मी लग्न करण्यासाठीच तेव्हा भारतात आले होते. मी सलमान खानचा मैने प्यार किया हा सिनेमा पाहिला आणि त्याच्यासाठी अक्षरशः वेडी झाले. मी त्यावेळी सोळा वर्षांची होते. मी त्यावेळी माझ्या आईलाही सांगितलं की मी सलमानशी लग्न करण्यासाठी मुंबईला चालली आहे. माझं आणि सलमानचं लग्न झालं आहे असं स्वप्नही मला तेव्हा पडलं होतं.