सलमानच्या हत्येसाठी लॉरेन्स बिश्नोईने घेतली होती ४ लाखांची रायफल, मग कट का फसला?
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सलमानच्या घराच्या सुरक्षेत वाढ केली आहे. सलमान खानला जिवे मारण्याची धमकी येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी लॉरेन्स बिश्नोईने धमकी दिली होती. इतकंच नाही, तर त्याने हल्ल्याचा कटही रचला होता. सलमान खानला जिवे मारण्याची धमकी आल्यानंतर पुन्हा एकदा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव […]
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सलमानच्या घराच्या सुरक्षेत वाढ केली आहे. सलमान खानला जिवे मारण्याची धमकी येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी लॉरेन्स बिश्नोईने धमकी दिली होती. इतकंच नाही, तर त्याने हल्ल्याचा कटही रचला होता.
ADVERTISEMENT
सलमान खानला जिवे मारण्याची धमकी आल्यानंतर पुन्हा एकदा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव समोर आलंय. कारण यापूर्वी लॉरेन्स बिश्नोईनेच सलमान खानला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्याने हत्येचा कटही रचला होता. याची लॉरेन्स बिश्नोईने स्वतःच कबूली दिली होती.
तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने तपास यंत्रणांकडून करण्यात आलेल्या चौकशी दरम्यान सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याचं सांगितलं होतं. लॉरेन्स बिश्नोईने खुलासा केला होता की, सलमान खानची हत्या करण्यासाठी राजस्थानातील गँगस्टर संपत नेहराला सांगितलं होतं. त्यानंतर संपत नेहरा मुंबईला गेला होता. त्याने सलमान खानच्या घराची रेकीही केली होती.
हे वाचलं का?
सलमानच्या हत्येचा कट का अपयशी ठरला?
लॉरेन्स बिश्नोईने सलमानच्या हत्येचा प्लान का अपयशी ठरला, याबद्दलही यंत्रणांना माहिती दिली होती. संपत नेहराजवळ पिस्तुल होतं. त्यातून दूरवर निशाणा लावता येत नाही. जास्त अंतर असल्यानेच संपत सलमान खानजवळ पोहचू शकला नाही.
ADVERTISEMENT
त्यानंतर संपत नेहराने गावातील दिनेश फौजीच्या माध्यमातून एक आरके स्प्रिंग रायफल मागवली. ही रायफल बिश्नोईने त्याच्या ओळखीतीलच अनिल पांड्याकडून ३ ते ४ लाख रुपयात खरेदी केली होती. पण, रायफल जवळ असतानाच संपत नेहरा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर त्याला अटक झाली.
ADVERTISEMENT
का करायची होती सलमान खानची हत्या?
गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता सलमान खानला जिवे मारण्याची धमकी देण्याचं कारण होतं, काळवीट शिकार प्रकरण. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा बिश्नोई समाजातील आहे आणि बिश्नोई समाजात प्राण्यांना देव मानलं जातं. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई नाराज झाला होता. लॉरेन्स बिश्नोईने सलमान खान रेडी सिनेमाच्या शुटिंग दरम्यान हल्ल्याचा कटही रचला होता.
तुरुंगातून चालवतो गँग
लॉरेन्स बिश्नोई दिल्लीतील तिहार तुरूंगात आहे. तेथूनच तो त्याची गँग चालवतो. व्हॉट्स अपच्या माध्यमातून तो सुपाऱ्या घेतो आणि हत्या करण्याचं काम देतो. त्यानंतर फेसबुकवर घटनेची जबाबदारी स्वीकारतो. लॉरेन्स गँगचं नेटवर्क संपूर्ण देशात पसरलेलं आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी बराड सोबत काम करतात. लॉरेन्स बिश्नोई गँगचाच सिद्धू मुसेवालाच्या हत्येत हात असल्याचं बोललं जातंय.
सलमान खानच्या वडिलांना मिळालं पत्र
सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना अज्ञात व्यक्तीने एक पत्र पाठवलं आहे. हे पत्र रविवारी वांद्रेतील बॅण्डस्डॅण्ड प्रोमेनाड येथे मिळालं होतं. सलमान खानला हे पत्र त्याठिकाणी मिळालं, जिथे सलीम खान दररोज मॉर्निंग वॉक गेल्यानंतर बसतात.
धमकीच्या पत्रा असं म्हटलं गेलंय की, ‘सलीम खान, सलमान खान लवकरच तुमच्यासोबत सिद्धू मुसेवालासारखं होणार आहे.’ या प्रकरणी मुंबई पोलिसांनी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT