मुश्रीफांविरुद्ध कारवाई, यशवंत जाधवांना दिलासा?; 2 केसमध्ये साम्य काय?

मुंबई तक

केंद्रीय यंत्रणा (central investigation agency) फक्त ठराविक पक्षाच्या नेत्यांना डोळ्यासमोर ठेवून कारवाई करत असतील तर ते योग्य नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते (leader of opposition) अजित पवार (ajit pawar) यांनी व्यक्त केली. विरोधकांकडून होणाऱ्या या टीकेला पुष्टी देणारं एक साम्य समोर आलंय. ते साम्य ED आणि IT ने 11 जानेवारीला कारवाई केलेले राष्ट्रवादीचे नेते […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

केंद्रीय यंत्रणा (central investigation agency) फक्त ठराविक पक्षाच्या नेत्यांना डोळ्यासमोर ठेवून कारवाई करत असतील तर ते योग्य नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते (leader of opposition) अजित पवार (ajit pawar) यांनी व्यक्त केली. विरोधकांकडून होणाऱ्या या टीकेला पुष्टी देणारं एक साम्य समोर आलंय. ते साम्य ED आणि IT ने 11 जानेवारीला कारवाई केलेले राष्ट्रवादीचे नेते (NCP Leader) हसन मुश्रीफ (hasan Mushrif) आणि शिंदे गटाचे नेते (Leader of Shinde Faction) यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावर झालेल्या आरोपांवरुन झालेल्या तक्रारीत आहे. हे साम्य समजून घेऊयात…

भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नेते शिंदे गट आणि भाजपमध्ये दिसतात. भाजप काय वॉशिंग मशिन आहे की भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नेते पक्षात गेल्यावर त्यांचे आरोप धुवून निघतात, अशी टीका विरोधी पक्ष नेहमी करत असतात.

आता हीच चर्चा पुन्हा हसन मुश्रीफ यांच्या घरी आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर कोल्हापूर आणि पुणे इथे झालेल्या ईडी आणि आयटीच्या धाडीनंतर सुरू आहे. पण तुलना होतेय ती हसन मुश्रीफ आणि शिंदे गटाचे आमदार यशवंत जाधव यांची.

त्याचं कारण थोडक्यात सांगायचं तर सारखे आरोप असताना मुश्रीफांच्या प्रकरणात तक्रार झाली आणि कारवाईही झाली. मात्रन यशवंत जाधव यांच्या प्रकणात तक्रार होऊनही ED ने कोणतीही कारवाई केलेली नाही.

हसन मुश्रीफ, 2 कारखाने, 100 कोटी अन् सोमय्यांचे आरोप; समजून घ्या प्रकरण

हे वाचलं का?

    follow whatsapp