आर्यन खानच्या आधी या 12 बॉलिवूड सेलिब्रिटींना करावा लागला आहे समीर वानखेडेंचा सामना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक कऱण्यात आली आहे. 2 ऑक्टोबरला अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग अर्थात NCB ने कॉर्डिलिया क्रूझवर ही कारवाई केली. 3 तारखेच्या सकाळी आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांच्यासह एकूण आठजणांना अटक करण्यात आली. तेव्हापासून हा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. तसंच समीर वानखेडे यांच्यावरही आरोप होत आहेत. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन यांनी हे आरोप केले आहेत. सोमवार आणि मंगळवार हे दोन्ही दिवस त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे आणि त्यांनी दिलेल्या उत्तरांमुळे गाजले.

ADVERTISEMENT

या प्रकरणात जशी चर्चा आर्यन खानची होते आहे तशीच समीर वानखेडे यांचीही होते आहे. समीर वानखेडे यांनी कारवाई केली आणि बॉलिवूडला सामना करावा लागला नाही याची ही पहिली वेळ नाही. समीर वानखेडे हे एनसीबीचे झोनल अधिकारी आहेत. ते आधी कस्टममध्ये होते. मी बॉलिवूडच्या विरोधात नाही, जे नियम मोडतील, कायदा पाळणार नाही त्यांच्या विरोधात मी आहे असं समीर वानखेडे यांनी म्हटलं होतं. आर्यन खानच्या आधी बारा असे कलाकार आहेत ज्यांना समीर वानखेडेंचा सामना करावा लागला आहे. आपण जाणून घेऊ त्याच कलाकारांविषय़ी.

हे वाचलं का?

शाहरुख खान – जुलै 2011 मध्ये शाहरुख खानला त्याच्या कुटुंबीयांसह एअरपोर्टवर थांबवण्यात आलं होतं. त्यावेळी शाहरुख खान त्याच्या कुटुंबीयांसह लंडनहून सुट्टी घालवून परत आला होता. जे लगेज शाहरुखकडे होतं ते एक्स्ट्रा होतं. त्यामुळे शाहरुखला दीड लाखांचा दंड भरावा लागला. त्यावेळी कस्टमच्या टीमचे प्रमुख समीर वानखेडेच होते.

ADVERTISEMENT

अनुष्का शर्मा : 2011 मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माला समीर वानखेडेंनी मुंबई विमानतळावर थांबवलं होतं. त्यावेळी अनुष्का शर्माकडे असलेल्या बॅगा तपासण्यात आल्या होत्या. त्यावेळीही समीर वानखेडे कस्टम डिपार्टमेंटमध्ये होते. अनुष्काच्या बॅगेत डायमंड ब्रेसलेट, नेकलेस, इअर रिंग्ज आणि दोन उंची घड्याळं होती. त्यामुळे अनुष्काची कस्टमने सुमारे अकरा तास चौकशी केली. त्यानंतर तिला घरी जाता आलं.

ADVERTISEMENT

कतरीना कैफ-खरंतर कतरीना कैफ कायमच वादांपासून दूर असते. मात्र कतरीना कैफला 2012 मध्ये मुंबई एअरपोर्टवर फॉरेन एक्स्चेंज रेग्युलेशन अॅक्टच्या अंतर्गत 12 हजार रूपयांचा दंड भरावा लागला होता. लगेज क्लेम न करता तिने एक्झिट घेतली. ज्या दोन बॅगा सापडल्या त्यात एक आयपॅड, दोन व्हिस्की बॉटल, ३० हजार रूपये कॅश सगळं पकडलं होतं. त्यामुळे तिला हा दंड भरावा लागला होता.

मिनिषा लांबा-मिनिषा लांबाला मुंबई एअर पोर्टवर 2011 ला रोखण्यात आलं होतं. कस्टम डिपार्टमेंटने तिला अडवलं होतं तिच्या बॅगची झडती घेण्यात आली होती. त्यामध्ये डायमंड ज्वेलरी, किंमती स्टोन होते. यांची किंमत 50 लाखांच्या घरात होती. या प्रकरणी समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने मिनिषा लांबाची सुमारे 16 तास चौकशी केली होती.

रणबीर कपूर- 2013 मध्ये रणबीर कपूर ब्रिटीश एअऱवेजच्या फ्लाईटने लंडनहून मुंबईला आला होता. त्यावेळी ज्या मार्गाने फक्त विमानतळ कर्मचारी आणि अधिकारी जाऊ शकतात त्या मार्गाने तो जात होता. त्यावेळी त्याच्या बॅगेत एक लाखांपेक्षा जास्त किंमतीचं सामान होतं. ४० मिनिटं रणबीरची चौकशी झाली. त्यानंतर त्याला 60 हजारांचा दंड भरावा लागला होता.

मीका सिंह- 2013 मध्ये मीका सिंह बँकॉकहून परत येत होता. त्याच्या बॅगेत नऊ लाख रूपयांचं सामान होतं. त्याची माहिती न देता तो एअरपोर्टच्या बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी कस्टमने त्याला अडवलं. त्याचीही चौकशी झाली होती. त्याच्या बॅगेत मद्याच्या बाटल्या, गॉगल्स आणि परमफ्युम्स मिळाले होते.

बिपाशा बसू– बिपाशा बसूलाही मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर समीर वानखेडेंच्या टीमने अडवलं होतं. तिच्याकडे 60 लाखांहून अधिक किंमतीचं सामान होतं. तिची चौकशी झाली होती आणि त्यानंतर तिला बारा हजार रूपये दंड भरावा लागला होता. ही कारवाईही समीर वानखेडे यांनीच केली होती.

अनुराग कश्यप– 2013 मध्ये समीर वानखेडे सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंटचे डेप्युटी कमिश्नर होते. त्यावेळी त्यांनी अनुराग कश्यपला टॅक्स इन्वेशनसंदर्भात 55 लाखांचा दंड भरावा लागला होता. अनुराग कश्यपचं अकाऊंटही त्यावर्षी डिसेंबरमध्ये सील करण्यात आलं होतं.

विवेक ओबेरॉय– अनुराग कश्यपच्या या केसनंतर एक महिन्याने विवेक ओबेरॉय ला सर्व्हिस टॅक्स डिपार्टमेंटद्वारे कर चुकवल्याप्रकरणी पकडण्यात आलं होतं. 40 लाखांच्या उत्पन्नात कर चुकवल्याचा आरोप त्याच्यावर झाला होता. त्यावेळी या विभागाचे डेप्युटी कमिश्नर समीर वानखेडेच होते.

रिया चक्रवर्ती– 8 सप्टेंबर 2020 ला रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. समीर वानखेडे हे त्यावेळी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी ही कारवाई केली होती.

दीपिका पदुकोण– सुशांत सिंह राजपूत प्रकरणात जो ड्रग्जचा अँगल समोर आला होता त्यावेळी दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग या सगळ्यांना एनसीबीने समन्स पाठवलं होतं. त्यांची चौकशीही झाली होती.

अरमान कोहली- अॅक्टर अरमान कोहलीला ऑगस्ट 2021 ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. ही कारवाईही समीर वानखेडे यांनी केली होती. हे प्रकरण सध्या चर्चेतही आहे.

आर्यन खान-आर्यन खानला 2 ऑक्टोबरला ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर या प्रकरणात त्याला 3 ऑक्टोबरला अटक करण्यात आली. आर्यन खानला अद्याप जामीन मिळालेला नाही. मात्र हे प्रकरण चर्चेत असून या प्रकरणात आत्तापर्यंत अनेक ट्विस्ट आणि टर्न समोर आले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT