Sameer Wankhede: नवाब मलिकांच्या आरोपांना पाहा NCB अधिकारी समीर वानखेडेंनी काय दिलं उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबईतील क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी NCB केलेली कारवाई ही बनावट आहे. असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. ज्याबाबत आता NCB चे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ADVERTISEMENT

‘पंच कोण आहेत, विटनेस कोण आहेत आणि त्यांचे अधिकार पण काय आहेत. याबाबत आम्ही आधीच प्रेस रिलीज काढून माहिती दिली आहे. त्यामुळे त्याबाबत अधिक काही बोलणं योग्य नाही.’ अशी प्रतिक्रिया देत समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

पाहा नेमकं काय म्हणाले समीर वानखेडे

हे वाचलं का?

‘या प्रकरणात एकूण 16 जणांना अटक झाली आहे. उद्या पण आणखी एका आरोपीला कोर्टात हजर करु. त्याला अटक झाली आहे. ज्यांची कस्टडी मिळाली आहे त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. पण त्यांच्यावरील पुढील कारवाई काही आपल्याला सांगता येणार नाही. कारण तो एक चौकशीचा भाग आहे.’

‘आमच्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत त्याबाबत आमच्या वरिष्ठांनी एक प्रेस रिलीज प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये सर्व लिहलं आहे. की, पंच कोण आहेत, विटनेस कोण आहेत आणि त्यांचे अधिकार पण काय आहेत. त्यामुळे त्याबाबत अधिक काही बोलणं योग्य नाही.’ असं समीर वानखेडे यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

क्रूझ ड्रग्स प्रकरणी नवाब मलिकांनी NCB वर कोणते आरोप केले?

ADVERTISEMENT

  • ‘NCB ने जो छापा टाकला त्यावेळी आर्यन खान याला NCB च्या कार्यालयात खेचून घेऊन येणारा माणूस हा नेमका कोण होता? याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. व्हायरल झालेला सेल्फीमधील तो माणूस देखील हाच आहे. पण NCB म्हणते की, तो आमचा अधिकारी नाही. जर असं असेल तर या छाप्यात नक्कीच काही तरी काळंबेरं आहे.’ असा थेट आरोप मलिकांना केला आहे.

  • ‘याच प्रकरणात अरबाज मर्चंट याला देखील अटक करण्यात आली. ज्याला NCB कार्यालयात घेऊन जाणारा दुसरा व्यक्ती हा मनिष भानुशाली नावाचा व्यक्ती होता.’

  • ‘हा मनिष भानुशाली भाजपचा उपाध्यक्ष आहे. तो देखील NCB चा अधिकारी नाही. मनिष भानुशाली याचे फोटो मोदी आणि अमित शाह यांच्यासोबत आहेत. देवेंद्र फडणवीसांसोबत आहे, गुजरातच्या अनेक मंत्र्यांसोबत आहेत, केंद्रीय मंत्र्यांसोबत आहेत.’

  • ‘त्यामुळे आता NCB ला सांगावं लागेल की, मनिष भानुशाली याचे NCB शी काय संबंध आहेत. NCB च्या रेडमध्ये भाजपचा पदाधिकारी सामील झालाच कसा? म्हणजेच NCB भाजपच्या इशाऱ्यावर काम करतं’ असं म्हणत मलिकांनी गंभीर आरोप केला आहे.

  • ‘पुढचं टार्गेट शाहरुख असं ते…’, मलिकांच्या पत्रकार परिषदेतील प्रत्येक शब्द जसाच्या तसा!

    • जप्त केलेल्या वस्तू पंचांशिवाय झोनल ऑफिसमध्येच उघडल्या: NCB ने केलेल्या कारवाईबाबत शंका उपस्थित करत काही मूलभूत प्रश्न नवाब मलिक यांनी विचारले आहेत.

    • ‘जेव्हा हे सगळं शनिवार आणि रविवारी सुरु होतं तेव्हा एनसीबीने काही फोटो चॅनलच्या प्रतिनिधींना पाठवले. ज्यामध्ये चरस, कोकेन आहे असं सांगण्यात आलं. या गोष्टी आम्ही क्रूझवर जप्त केल्याचं देखील त्यांनी सांगितलं. पण NDPS कायद्यात जप्तीची एक प्रक्रिया आहे.’

    • ‘हे जे फोटो आहेत ते कोणत्याही क्रूझवरील नाहीत. हे फोटो झोनल डायरेक्टरच्या ऑफिसमधील आहे. त्याचा एक व्हीडिओ मी तुम्हाला दाखवतो.’ असे अनेक गंभीर आरोप यावेळी नवाब मलिक यांनी केला आहे.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT