समीर वानखेडेंवर प्रचंड खळबळजनक आरोप करण्यात आलेलं ‘ते’ पत्र जसंच्या तसं…
मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात एका निनावी पत्रातून अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे पत्र एका एनसीबी कर्मचाऱ्याने लिहलं असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. हे संपूर्ण पत्र त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर देखील शेअर केलं आहे. पाहा त्या पत्रात नेमकं काय म्हटलंय. समीर वानखेडेंवर गंभीर […]
ADVERTISEMENT

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात एका निनावी पत्रातून अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे पत्र एका एनसीबी कर्मचाऱ्याने लिहलं असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. हे संपूर्ण पत्र त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर देखील शेअर केलं आहे. पाहा त्या पत्रात नेमकं काय म्हटलंय.
समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करणारं ‘ते’ पत्र जसच्या तसं..
‘मी एनसीबीचा एक कर्मचारी आहे. मागील दोन वर्षापासून मुंबई कार्यालयात कार्यरत आहे. मागील वर्षी एनसीबीला सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ड्रग अँगलची चौकशी सोपविण्यात आली आणि माजी महासंचालक श्री. राकेश अस्थाना यांनी एसआयटीचं गठन करुन आपले चेले कमल प्रीत सिंह मल्होत्रा यांना एसआयटीचं प्रभारी बनवून मुंबईमध्ये ड्रग अँगलची चौकशी सोपवली आणि सोबत समीर वानखेडे जे (DRI) मुंबईमध्ये काम करत होते त्यांना गृहमंत्री अमित शाह यांना सांगून नियमबाह्य पद्धतीने डीआरआयने लोन बेसिसवर एनसीबी मुंबईमध्ये झोनल डायरेक्टर पदावर नियुक्त केलं.’
‘राकेश अस्थाना जे सर्वांनाच माहिती आहेत की, ते किती इमानदार अधिकारी आहेत, त्यांनी समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना साम, दाम, दंड आणि इतर कोणत्याही मार्गाने बॉलिवूडच्या कलाकारांना ड्रग प्रकरणा अडकवून त्यांच्याविरोधात केस तयार करण्याचे आदेश दिले. केस दाखल केल्यानंतर केपीएस मल्होत्रा आणि समीर वानखेडे यांनी या कलाकारांकडून कोट्यवधी रुपयांची मागणी केली आणि कोट्यवधी रुपये उकळून राकेश अस्थाना यांना देखील त्यातील काही हिस्सा दिला.’










