सांगली: पोलीस स्टेशनच्या आवारातच तरुणाने स्वत:ला घेतलं पेटवून

मुंबई तक

स्वाती चिखलीकर, सांगली सांगली जिल्ह्यातील मिरज शहर पोलीस स्टेशन आवारात मध्यरात्री एका युवकाने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सर्फराज मोहम्मदअली जमखंडीकर असं या युवकाचं नाव असल्याचं समजतं आहे. तरुणाने दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. जखमी युवकाला पोलिसांनी उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

स्वाती चिखलीकर, सांगली

सांगली जिल्ह्यातील मिरज शहर पोलीस स्टेशन आवारात मध्यरात्री एका युवकाने अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सर्फराज मोहम्मदअली जमखंडीकर असं या युवकाचं नाव असल्याचं समजतं आहे. तरुणाने दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

जखमी युवकाला पोलिसांनी उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सदर युवकाला विझविण्याचा प्रयत्न करत असताना एक पोलीस कर्मचारी देखील किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत मिरज शहर पोलिसांनी सर्फराज जमखंडीकर याच्याविरुद्ध आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सर्फराज जमखंडीकर हा मध्यरात्री मिरज शहर पोलीस स्थानकात आला आणि आपला काही तरुणांबरोबर वाद झाल्याने त्या तरुणांना तात्काळ अटक करा असे सांगून आरडाओरडा करू लागला.

तो तरुण नशेत असल्याने पोलिसांनी त्याला सोबत घेऊन घटनास्थळी गेले. पण तिथे गेल्यावर पोलिसांना कोणीही सापडलं नाही. त्यामुळे पोलिसांनी तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये थांबण्यास सांगितले. मात्र तो आरडाओरडा करून दंगा करू लागला आणि बाहेर जाऊन त्याने पोलीस स्टेशनच्या आवारात सोबत आणलेल्या पेट्रोल बाटलीतून पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले.

काही समजण्याच्या आतच सर्फराजने आपल्या सोबत आणलेल्या काडी पेटीने स्वत:ला पेटवून घेतले. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे आणि कोळेकर यांनी त्याला विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पेट्रोलने पटकन पेट घेतल्याने सर्फराज हा 30 ते 35 टक्के भाजला आहे.

पगार न देणाऱ्या मालकाची बाईक मजुराने भर रस्त्यात जाळली, पोलिसांनी केली मजुराला अटक

दरम्यान, त्याला तातडीने त्याला उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले. पोलीस स्टेशनमध्येत अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा या घटनेने सांगलीत एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी बुधवारी त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हाही दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्फराज यांची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. सध्या पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. तसेच सर्फराजने तरुणांसोबत वाद झाल्याचं म्हटलं आहे त्याविषयी देखील आता पोलीस माहिती घेत असल्याचं समजतं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp