सांगली : ५० लाखांच्या खंडणीसाठी शिक्षकाचं मुलासह अपहरण, पाच जणांना अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील पेशाने शिक्षक असलेले शिवाजी यशवंत ढोले आणि त्यांचा मुलगा पियुष यांचं अपहरण करुन ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यात आणखी काही जण सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ADVERTISEMENT

पीडित शिवाजी ढोले हे काकाचीवाडी येथील सेवा सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. याव्यतिरीक्त आष्टा येथील जिल्हा परिषदेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिवाजी ढोले हे आपला मुला पियुषसोबत एका ढाब्यावर जेवून आष्टामार्गे सांगलीला येत होते. रात्री १० वाजल्याच्या सुमारास कसबे डिग्रज हद्दीत एक पांढऱ्या रंगाची कार ढोले यांच्यासमोर येऊन थांबली. या कारच्या नंबरप्लेटवर गुलाल लागला होता.

या कारमधून काही लोकं खाली उतरले आणि त्यांनी ढोले आणि त्यांच्या मुलावर गुलाल टाकला. हा कसला गुलाल टाकताय असं विचारलं असता या लोकांनी ढोले आणि त्यांच्या मुलाचा चेहरा झाकून त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर आपल्या गाडीत बसवून त्यांना एका निर्जन स्थळी नेलं. जिवंत बाहेर जायचं असेल तर ५० लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी अपहरणकर्त्यांनी ढोले यांना दिली. यावेळी त्यांच्याजवळ सुरा, चाकू, चॉपर अशी हत्याचं असल्याचंही ढोले यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

ढोले यांनी पैसे देण्याचं मान्य केल्यानंतर स्वतःजवळील २० हजारांची रक्कम देत सुटका करुन घेतली. यानंतर त्यांनी सांगली पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास करत १० पैकी पाच अपहरणकर्त्यांना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT