“अगली बार चुन चुन के मारे जायेंगे” : राड्यानंतर आमदार गायकवाड यांचा ठाकरे गटाला इशारा
बुलढाणा : बुलढाण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शिवसेनेतील ठाकरे विरुद्ध शिंदे गटामध्ये तुफान राडा झाला. ठाकरे गटाच्या एका सत्कार कार्यक्रमावर काही तरुणांनी अचानक हल्ला केला. यात शिवसेनेचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांनाही मारहाण करण्यात आली, असे सांगण्यात येत आहे. हल्ला केलेले हे कार्यकर्ते शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे असल्याचा […]
ADVERTISEMENT

बुलढाणा : बुलढाण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज शिवसेनेतील ठाकरे विरुद्ध शिंदे गटामध्ये तुफान राडा झाला. ठाकरे गटाच्या एका सत्कार कार्यक्रमावर काही तरुणांनी अचानक हल्ला केला. यात शिवसेनेचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांनाही मारहाण करण्यात आली, असे सांगण्यात येत आहे.
हल्ला केलेले हे कार्यकर्ते शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे असल्याचा आरोप संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केला. त्यावर आमदार गायकवाड यांनीही हे आपलेच कार्यकर्ते असल्याचे मान्य करत या हल्लाचे समर्थनही केले. तसेच पुढच्या वेळी चुन चुन के मारे जायेंगे, गिन गिन के मारे जायेंगे, असे म्हणतं ठाकरे गटाला इशाराही दिला आहे.
चुन चुन के मारे जायेंगे, गिन गिन के मारे जायेंगे :
संजय गायकवाड म्हणाले, शिवसेना, संजय गायकवाड आणि त्याचे कार्यकर्ते किती पागल आहेत हे त्यांना अजून माहित नाही. आग्या मोहोळसारखे डसणारे कार्यकर्ते आहेत. हे जर चिडले तर कोणाच्या बापालाही ऐकणार नाहीत. त्यानंतरही जर यांनी काही भानगड करण्याचा प्रयत्न केला तर चुन चुन के मारे जायेंगे, गिन गिन के मारे जायेंगे.
यापुढे त्यांनी काही केवळं करुन दाखवावचं, मग सांगेन आम्ही काय चीज आहोत. ते जे म्हणतं आहेत आम्ही असं करु, तसं करु, तुम्ही करुनच दाखवा. आज त्यांचे भाग्य होते की पोलिसमध्ये होते, अन्यथा सगळा हिशोब चुकता केला असता.