‘स्वतःचे काय?’, भाजपवर चोरीचा आरोप करत संजय राऊतांचा ‘रोखठोक’ सवाल
‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधी कुटुंबानं (Gandhi Family) आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. मात्र स्वातंत्र्यासाठी तुमचा कुत्राही मेला नाही,’ काँग्रेस अध्यक्ष (congress president) मल्लिकार्जून खरगे (mallikarjun kharge) यांच्या विधानावर भाजप (bjp) संताप व्यक्त केला. याच गदारोळावरून संजय राऊतांनीही (Sanjay Raut) भाजपला खिंडीत गाठलंय. संजय राऊतांनी तर भाजपवर महापुरुषांच्या चोरीचा आरोप केलाय. स्वातंत्र्य लढ्यातील भाजप आणि संघाच्या (bjp and […]
ADVERTISEMENT

‘देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधी कुटुंबानं (Gandhi Family) आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. मात्र स्वातंत्र्यासाठी तुमचा कुत्राही मेला नाही,’ काँग्रेस अध्यक्ष (congress president) मल्लिकार्जून खरगे (mallikarjun kharge) यांच्या विधानावर भाजप (bjp) संताप व्यक्त केला. याच गदारोळावरून संजय राऊतांनीही (Sanjay Raut) भाजपला खिंडीत गाठलंय. संजय राऊतांनी तर भाजपवर महापुरुषांच्या चोरीचा आरोप केलाय.
स्वातंत्र्य लढ्यातील भाजप आणि संघाच्या (bjp and Rss) योगदानावरून काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी भाजपला डिवचलं. त्यावरून भाजप आक्रमक झाल्याचं दिसलं. मल्लिकार्जून खरगे यांच्याच विधानावर बोट ठेवत संजय राऊतांनी रोखठोकमधून (Sanjay Raut Rokhthok) भाजपला सुनावलं आहे.
संजय राऊत रोखठोकमध्ये (Rokhthok) म्हणतात, “खरगे यांच्या विधानावरून भारतीय जनता पक्ष संतापला आहे. पण चिडून, संतापून, आदळआपट करून काय उपयोग? खरगे यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याचा प्रतिवाद भारतीय जनता पक्षाने करायला हवा, पण खरगे यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर भारतीय जनता पक्षाकडे नाही.”
MP Aubhav Mohanty : 8 वर्षांपासून पत्नीशी शारीरिक संबंध नाहीत; खासदाराच्या दाव्याने खळबळ