शिंदे गुवाहटीला तर ठाकरे शेतकऱ्यांमध्ये : राऊतांनी केली आजी-माजी मुख्यमंत्र्यांची तुलना
मुंबई : बंडात साथ दिलेल्या सर्व सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहटीला गेले आहेत. शनिवारी सकाळी साडे-नऊ वाजता मुंबई विमानतळावरून शिंदेंसह त्यांचे समर्थक आजी-माजी आमदार, खासदार आणि त्यांचे कुटुंबिय असे जवळपास १७८ सदस्य एका विषेश विमानाने गुवाहटीला रवाना झाले. दरम्यान, शिंदेंच्या याच दौऱ्यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. तसंच त्यांनी […]
ADVERTISEMENT
मुंबई : बंडात साथ दिलेल्या सर्व सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा गुवाहटीला गेले आहेत. शनिवारी सकाळी साडे-नऊ वाजता मुंबई विमानतळावरून शिंदेंसह त्यांचे समर्थक आजी-माजी आमदार, खासदार आणि त्यांचे कुटुंबिय असे जवळपास १७८ सदस्य एका विषेश विमानाने गुवाहटीला रवाना झाले. दरम्यान, शिंदेंच्या याच दौऱ्यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. तसंच त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही शिंदेंची तुलना केली.
ADVERTISEMENT
काय म्हणाले संजय राऊत?
एकनाथ शिंदे आज गुवाहटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. त्याचवेळी उद्धव ठाकरे हे बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहेत. महाराष्ट्रात सरकार असल्याचा काही बरा-वाईट परिणाम होत नाहीये. पण ठाकरे हेच खरे सरकार आहे. आज आम्ही सगळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी जात आहोत. बुलढाण्यात संध्याकाळी जाहीर सभा आहे. अनेक विषयांवरती उद्धव ठाकरे आपल्या भूमिका मांडतील.
विषेशतः मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचा होत असलेला अपमान, कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील, महाराष्ट्राचे राज्यपाल असतील भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी असतील या सर्वांचा समाचार घेतला जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वीरपुरुष ज्या मातेने आम्हाला दिला, त्या राष्ट्रामाता जिजाऊ यांच्या भूमीत ही सभा होणार आहे. महाराष्ट्रातून अनेक राजकीय पक्ष, विरोधी पक्ष यांचा पाठिंबा मिळत आहे. आजच भारतीय जयहिंद पक्षाच्या नेत्यांनी त्यांचा पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही चाललं आहे, त्यावरुन संतप्त वातावरण आहे, असही राऊत म्हणाले.
हे वाचलं का?
एकनाथ शिंदे गुवाहटीला :
जून महिन्यात शिवसेनेतील बंडखोरीदरम्यान गुवाहटीहून परत येताना शिंदेंसह सर्वांनी कामाख्या देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला होता. त्यानंतर शिंदे आणि सहाकाऱ्यांनी महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्री, मंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता बंड यशस्वी झाल्याचा दावा करत एकनाथ शिंदे आणि सहकारी पुन्हा एकदा गुवाहटीला जाऊन कामाख्या देवीचा आशीर्वाद घेणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT