Prasad Lad: ‘राजकीय गांजाडयांना मराठी माणूस सेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपतील,’ राऊतांची प्रसाद लाडांवर बोचरी टीका
मुंबई: भाजपचे (BJP) विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) फोडण्याची भाषा केल्यानंतर शिवसैनिक प्रचंड संतापले आहेत. प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे (Shiv Sena) अनेक नेते प्रसाद लाड आणि भाजपवर जोरदार टीका करत आहेत. अशाच वेळी आता शिवसेनेचे खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील प्रसाद […]
ADVERTISEMENT

मुंबई: भाजपचे (BJP) विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) फोडण्याची भाषा केल्यानंतर शिवसैनिक प्रचंड संतापले आहेत. प्रसाद लाड यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे (Shiv Sena) अनेक नेते प्रसाद लाड आणि भाजपवर जोरदार टीका करत आहेत. अशाच वेळी आता शिवसेनेचे खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील प्रसाद लाड यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
‘राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही.( समझनेवालोंको इशारा काफी है..)’ अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर संजय राऊतांची बोचरी टीका
‘महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. ( समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?’ अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांना सुनावलं आहे.









