‘त्या’ एका फोटोमुळे संजय राऊत अडचणीत, थेट पोलिसात गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बार्शी: बार्शी (Barshi) तालुक्यातील एका घटनेचा फोटो शेअर करणं शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार आणि नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना चांगलंच महागात पडलं आहे. कारण पीडित अल्पवयीन मुलीचा फोटो शेअर केल्याने आता संजय राऊत यांच्याविरोधात सोलापुरात (Solapur) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊतांवर गुन्हा का दाखल झाला? आणि ही घटना नेमकी काय? हे आपण सविस्तर जाणून घेऊया. (sanjay raut in trouble for sharing the victims underage girls photo on twitter filed a crime with the police)

ADVERTISEMENT

बार्शीत अत्याचाराची तक्रार दिल्याचा राग मनात धरून एका अल्पवयीन मुलीवर हल्ला झाला. त्याचाच फोटो संजय राऊतांनी ट्वीट केला. यातून त्यांनी भाजपवर आरोप केले आणि जोरदार टीकाही केली.

हे वाचलं का?

राऊत त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘भाजप पुरस्कृत गुंडांनी हा जीवघेणा हल्ला केला. अल्पवयीन मुलगी पारधी समाजाची आहे. गरिबांच्या मुली रस्त्यावर पडल्या आहेत का?’ असा सवाल राऊतांनी यावेळी केला.

दुसरीकडे बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी संजय राऊतांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.

ADVERTISEMENT

Crime: 32 वर्षीय महिला डॉक्टरवर क्लिनिकमध्ये घुसून जीवघेणा हल्ला

ADVERTISEMENT

‘संजय राऊत यांनी जे ट्विटरवर नाहक भाजपची आणि देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून जे ट्विट केलं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. खऱ्या अर्थाने बार्शी तालुक्यामध्ये पीडितेच्या बाबत जी काही घटना घडली होती त्या घटनेशी कोणत्याही पक्षाचा काहीही संबंध नाही. त्या पीडित मुलीवर जो अन्याय झाला आहे त्या अन्यायाबाबत पोलीस यंत्रणेने तात्काळ दखल घेऊन काही कारवाई करायच्या आहेत त्या केलेल्या आहेत. पण कोणताही पक्षाशी संबंध नाही. तो खाजगी… एका गावातील एक प्रश्न आहे. कोणत्याही समाजाचा, पक्षाचा नाही.. तरी देखील राजकीय द्वेषापोटी ट्विटरमध्ये टीका करायची ही दुर्दैवी बाब आहे.’ असं राजेंद्र राऊत यावेळी म्हणाले आहेत.

Raut: संजय राऊत कायद्याच्या कचाट्यात? शिवसैनिकाची तक्रार, गुन्हा दाखल

एकीकडे संजय राऊतांनी मुलीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याबाबत भाजपवर आरोप तर केले. पण, दुसरीकडे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. खरं तर भाजपवर आरोप करताना संजय राऊत यांनी पीडित मुलीचा फोटो चेहर ब्लर न करता तो जसाच्या तसा शेअर केला. त्यामुळे अल्पवयीन पीडितेची ओळख सार्वजनिक झाली. या कारणामुळे संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Baba Ramdev : “अमृता वहिनी शांत कशा बसल्या?; कानाखाली द्यायला पाहिजे होती” : संजय राऊत

नेमकं प्रकरण काय?

बार्शी तालुक्यातील बालेवाडी येथे 5 मार्च रोजी पारधी कुटुंबातील अल्पवयीन मुलगी संध्याकाळी शिकवणी संपल्यावर घरी निघाली होती. यावेळीदोन तरुणांनी अडवून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. त्यानंतर पीडित मुलीने तात्काळ पोलिसात तक्रार केली. याच गोष्टीचा राग मनात धरून दोन आरोपींनी जबरदस्तीने थेट मुलीच्या घरात घुसून तिच्यावर सत्तूर आणि कोयत्याने वार केले. ज्यामध्ये पीडित मुलगी ही गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत.

बार्शी तालुक्यातील बळेवाडीमधील या घटनेचे पडसाद विधानपरिषदेतही उमटले. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण देखील लागलं आहे.

पुणे: मोबाइल नंबर न दिल्याने तरुणीवर अ‍ॅसिड फेकण्याची धमकी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT