संजय राऊतांनी भाजपला डिवचलं, म्हणाले, ‘कसब्यात शिवसेनेमुळे BJP जिंकायचं, आता..’
Sanjay Raut provoke to BJP: कोल्हापूर: ‘कसब्यात गेले 40 वर्ष भाजप हा फक्त शिवसेनेच्याच (Shiv Sena) पाठिंब्याने जिंकून येत होता. कसब्यात भाजपचा विजय हा शिवसेनेमुळे होत होता.. आज शिवसेना ही महाविकास आघाडीची घटक आहे आणि आम्ही सगळे एकत्र आहोत. त्याचा परिणाम कसब्यात दिसतोय.’ असं वक्तव्य शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं […]
ADVERTISEMENT

Sanjay Raut provoke to BJP: कोल्हापूर: ‘कसब्यात गेले 40 वर्ष भाजप हा फक्त शिवसेनेच्याच (Shiv Sena) पाठिंब्याने जिंकून येत होता. कसब्यात भाजपचा विजय हा शिवसेनेमुळे होत होता.. आज शिवसेना ही महाविकास आघाडीची घटक आहे आणि आम्ही सगळे एकत्र आहोत. त्याचा परिणाम कसब्यात दिसतोय.’ असं वक्तव्य शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. कोल्हापुरात (Kolhapur) माध्यमांशी बोलताना त्यांनी कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणूक (Bypoll) निकालावर ही प्रतिक्रिया देत भाजपला (BJP) पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. (sanjay raut lashed out at bjp saying bjp should win because of shiv sena in kasba constituency)
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
‘महाराष्ट्र किती मजबुतीने पुढे जातंय यांचं कसबा हे ज्वलंत उदाहरण आहे. ज्या कसब्यात गेले 40 वर्ष भाजप हा फक्त शिवसेनेच्याच पाठिंब्याने जिंकून येत होता. कसब्यात भाजपचा विजय हा शिवसेनेमुळे होत होता.. आज शिवसेना ही महाविकास आघाडीची घटक आहे आणि आम्ही सगळे एकत्र आहोत. त्याचा परिणाम कसब्यात दिसतोय. चिंचवडचे पूर्ण निकाल येऊ द्या.. मला खात्री आहे की, चिंचवड मतदारसंघात शेवटपर्यंत भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.’
‘चिंचवडबाबत आम्ही अपेक्षा ठेवून आहोत. कसब्याबाबत आम्ही सगळेजण खात्रीने सांगत होतो की, भाजपचा हा गड कोसळणार.. चिंचवड हा काही भाजपचा गड नाही. तो एका कुटुंबाची तिथे मक्तेदारी होती.. जगतापांची.. तिथे पक्षापेक्षा जगताप पॅटर्न चालतो हे माहितीए आपल्याला..’
Kasba Peth By Election Results: धंगेकरांनी घडवला इतिहास! भाजपने बालेकिल्ला गमावला
‘गिरीश बापट असतील.. मुक्ताताई टिळक असतील.. त्यांना सुद्धा ज्या पद्धतीने दोन-तीन वेळा विधिमंडळात मतदानासाठी आणलं.. जगतापांना देखील आणलेलं.. हे अमानुष राजकारण आहे. निष्ठा वैगरे ठीक आहे.. पक्षाप्रती वैगरे.. पण हे अमानुष आहे.. पण एक व्यक्ती जिला चालता येत नाही.. आजारी आहेत त्या.. अखेरच्या घटका मोजत असताना देखील तुम्ही तुमच्या एक-दोन मतांसाठी धरून आणलं.. लोकांना हे आवडत नाही. महाराष्ट्रात विशेषत: कसब्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच मंत्रिमंडळाने जवळजवळ कॅम्पच केला होता. पोलीस अधिकाऱ्यांचा, प्रशासनाचा वापर.. तरीही महाविकास आघाडीचे उमेदवार हे पुढे आहेत. ते जिंकून येतील.’ अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.