राहुल गांधींनी संजय राऊतांकडे व्यक्त केली खंत; ‘त्या’ बैठकीबद्दल राऊतांचं प्रथमच भाष्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लखीमपूर खीरीतील हिंसाचारानंतर भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना नजरकैद करण्यात आलं होतं. त्यांना नजरकैद केल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीत काय चर्चा झाली याबद्दल राऊत यांनी त्यावेळी फार माहिती दिली नाही. मात्र, आता त्यांनी याबद्दल सविस्तर भाष्य केलं आहे.

ADVERTISEMENT

लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्यात आलं. यानंतर संतप्त भावना उमटल्या. या घटनेवरून योगी सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला. दरम्यान, याच काळात संजय राऊत यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. प्रियंका गांधी यांना झालेली अटक आणि राहुल गांधी यांच्या भेटीबद्दल संजय राऊत यांनी ‘रोखठोक’मधून भाष्य केलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत…?

हे वाचलं का?

मंगळवारी दुपारी मी दिल्लीत राहुल गांधी यांना भेटलो. 12, तुघलक लेन हे त्यांचे निवासस्थान. राहुल गांधी लाल रंगाचे टी-शर्ट व पायजमा अशा साध्या वेशात गप्पा मारत होते. ‘या लोकांनी देशात काय चालवले आहे पाहा.’ अशी सुरुवात गांधी यांनी केली.

‘यह लोक लोकतंत्र को पुरी तरह से खतम करने जा रहे है। लेकीन हम लढेंगे!’ हे त्यांचे पुढचे विधान अधिक महत्त्वाचे. प्रियंका गांधी तुरुंगात होत्या व उत्तर प्रदेश सरकारने राहुल यांच्या या बहिणीस 36 तास बेकायदेशीरपणे डांबून ठेवले. ‘आप चिंता मत करिये,’ असे मी म्हणताच, ‘हम जेल की चिंता नही करेंगे। प्रियंका में हिम्मत है। मी उद्याच लखनौला निघतोय. मला अटक झाली तरी हरकत नाही,’ असे राहुल गांधी म्हणाले.

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशातील सर्वच राजकारणी हातचे राखून लढायला उतरले आहेत. प्रत्येकाचे हात कुठेतरी दगडाखाली अडकले आहेत. त्यामुळे ‘खुलकर’ कोणीच लढत नाही. गांधी यांचा रोख बहुधा मायावतींवर असावा. उत्तर प्रदेशसारखे मोठे राज्य जाती-धर्मात विभागले आहे. त्यामुळेच भाजपचा फायदा होतो, पण एक वेळ अशी येईल काँग्रेसच भाजपचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही.

ADVERTISEMENT

राहुल गांधी हे म्हणाले, तो दिवस लवकर उजाडो हीच अपेक्षा. ‘पंजाबचा तिढा सुटला काय?” मी.

‘नक्कीच. सगळे आमदार काँग्रेससोबतच आहेत. जुन्या व्यवस्थेवरच त्यांची नाराजी होती.” – गांधी.

‘सिद्धूचे काय करणार?” मी.

‘तेसुद्धा शांत होतील.” गांधी.

आप आणि तृणमूल काँग्रेस मतांचे विभाजन घडवून भाजपचाच फायदा करून देत आहेत. गोव्यात काही संबंध नसता तृणमूल व आप आली आणि त्यांनी काँग्रेसचे आमदार फोडले. पैशांचा वापर त्यासाठी सगळेच करतात ही खंत गांधींनी बोलून दाखवली. ती खरीच आहे. तृणमूल व आम आदमी पक्ष काँग्रेसला गिळत आहे. त्यांनी भाजपचे निदान शेपूट तरी तोडावे. काँग्रेस कमजोर करणे व त्यातून स्वतः वाढणे हे शेवटी भारतीय जनता पक्षालाच सोयीचे ठरते.

ममता बॅनर्जी यांनी बंगाल जिंकले, पण संपूर्ण देशात त्यांना स्वीकारार्हता नाही व केजरीवाल हे केंद्रशासित दिल्लीचेच मांडलिक राजे. हे कोणीच समजून घ्यायला तयार नाही. या सगळ्यांना राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी नकोत. कारण देशाचे नेते होण्याची क्षमता त्यांच्यात आहे. मोदी व शहांचेही तेच मत आहे. विरोधकांची एकजूट होऊ नये व काँग्रेस कमजोरच राहावी हे भाजपला वाटणे व इतर विरोधकांनाही तेच वाटणे यात फरक आहे.

प्रियंका गांधी लखीमपूर खेरीत जाताना त्यांना अडवले व तुरुंगात टाकले. दुसऱ्या दिवशी असंख्य लोक हाती मशाली घेऊन रस्त्यावर उतरले, तेव्हा सीतापूरला काँग्रेसकडे इतके कार्यकर्ते आले कुठून, हा प्रश्न अनेकांना पडला. गांधी घराण्याचे वलय आजही आहे. काँग्रेसला सहज संपवता येणार नाही, हे प्रियंकांच्या अटकेने पुन्हा स्पष्ट झाले. इंदिरा गांधीच अवतरल्या…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT