शरद पवारांना मी खुर्ची दिली यामध्ये कुणाच्या पोटात दुखण्याचं कारण काय?-संजय राऊत
शरद पवारांना बसायला संजय राऊत यांनी खुर्ची दिली तो फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. याबाबत संजय राऊत यांना मुंबई तकच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत प्रश्न विचारला असता, संजय राऊत यांनी या प्रश्नाला रोखठोक शैलीत उत्तर दिलं आहे. शरद पवार हे वयाने ज्येष्ठ नेते आहेत त्यांना खुर्ची दिली तर त्यात गैर काय? कुणाच्या पोटात दुखण्याचं कारण काय? […]
ADVERTISEMENT

शरद पवारांना बसायला संजय राऊत यांनी खुर्ची दिली तो फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. याबाबत संजय राऊत यांना मुंबई तकच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत प्रश्न विचारला असता, संजय राऊत यांनी या प्रश्नाला रोखठोक शैलीत उत्तर दिलं आहे. शरद पवार हे वयाने ज्येष्ठ नेते आहेत त्यांना खुर्ची दिली तर त्यात गैर काय? कुणाच्या पोटात दुखण्याचं कारण काय? असे प्रश्न संजय राऊत यांनी भाजपला विचारले आहेत.
दोघांच्या संसारात रोज खडखडाट व्हायचा, तिघांचा संसार उत्तम चालला आहे-संजय राऊत
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
शरद पवार यांना मी खुर्ची दिली यामध्ये कुणाच्या पोटात दुखण्याचं कारण काय? शरद पवारांनी महाराष्ट्रात इतक्या लोकांना सत्तेच्या खुर्च्या दिल्या आहेत. अशात मी खुर्ची दिली यावरून त्रास कशाला होतो आहे लोकांना? मी आंदोलनात ज्येष्ठ नेत्यांना बोलावलं होतं. अशात जर काही नेत्यांना त्रास असेल आणि त्यांना खुर्ची दिली तर ती आपली संस्कृती आहे. मल्लिकार्जुन खरगे तिथे आले होते त्यांना मी खुर्ची दिली. मुलायम सिंग यादव आले होते त्यांनाही बसायला खुर्ची दिली.