सातारा जिल्हा बँक निवडणूक : चार राजे बिनविरोध, पण माजी पालकमंत्र्यांसमोर विजयाचं मोठं आव्हान
-इम्तियाज मुजावर, सातारा सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्यापर्यंत झालेलं राजकीय धमासान संपूर्ण जिल्ह्यानं पाहिलं. आता 21 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून, यामध्येच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी अर्ज दाखल करण्यापासून ते अर्ज माघारी घेईपर्यंत अनेक राजकीय आणि नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. रामराजे नाईक निंबाळकर, उदयनराजे भोसले, शिवरूप राजे व शिवेंद्रसिंह […]
ADVERTISEMENT

-इम्तियाज मुजावर, सातारा
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्यापर्यंत झालेलं राजकीय धमासान संपूर्ण जिल्ह्यानं पाहिलं. आता 21 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून, यामध्येच जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी अर्ज दाखल करण्यापासून ते अर्ज माघारी घेईपर्यंत अनेक राजकीय आणि नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. रामराजे नाईक निंबाळकर, उदयनराजे भोसले, शिवरूप राजे व शिवेंद्रसिंह राजे हे चारही राजेंची जिल्हा बँकेत बिनविरोध निवड झाली आहे.
शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचातील कट्टर राजकीय घमासान सातारा जिल्ह्याने पाहिलं, तर उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून सातारा जिल्हा पाहत आहे. आता तिन्ही राजे परस्परविरोधी राजकीय वर्तुळात असून देखील बिनविरोध निवडल्या गेल्याने जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे. जिल्ह्यातील फलटणचे दोन राजे आणि साताऱ्याचे दोन राजेंची निवड बिनविरोध झाली असली, तरी विद्यमान पालकमंत्री बाळासाहेब पाटील, माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे व राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर निवडणुकीत लढाई लढण्याची वेळ का आली, असा प्रश्न जिल्ह्यात उपस्थित होत आहे.
राज्यात महाविकास आघाडी असून, राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनाच जिल्हा बँकेच्या शिवेंद्रसिंह राजे भोसले व रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या पॅनेलमध्ये स्थान मिळालेलं नाही. चार राजे बिनविरोध आणि आजी-माजी पालकमंत्री व गृह राज्यमंत्री यांच्यावर निवडणूक लढण्याची वेळ आल्यानं जिल्ह्यात जिल्हा बँकेची निवडणूक चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.