बिश्नोई गँगबाबत महाकालचा धक्कादायक खुलासा; अनेक दिग्दर्शक, निर्माते होते निशाण्यावर
नवी दिल्ली: पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव समोर आले आहे. आता लॉरेन्स बिश्नोई टोळीबाबत मोठा खुलासा झाला आहे. पंजाब म्युझिक इंडस्ट्रीनंतर लॉरेन्स बिश्नोई गँग बॉलिवूडमध्ये आपली दहशत पसरवण्याच्या तयारीत होती. लॉरेन्स गँगचे लक्ष्य होते ते मोठे स्टार, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते असा दावा खुद्द गँगस्टर सौरभ महाकालने केला आहे. सौरभ महाकालने […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव समोर आले आहे. आता लॉरेन्स बिश्नोई टोळीबाबत मोठा खुलासा झाला आहे. पंजाब म्युझिक इंडस्ट्रीनंतर लॉरेन्स बिश्नोई गँग बॉलिवूडमध्ये आपली दहशत पसरवण्याच्या तयारीत होती. लॉरेन्स गँगचे लक्ष्य होते ते मोठे स्टार, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते असा दावा खुद्द गँगस्टर सौरभ महाकालने केला आहे.
सौरभ महाकालने केला धक्कादायक खुलासा
लॉरेन्स टोळीचा कुख्यात गँगस्टर सौरभ महाकाल याचा कबुलीजबाब ‘आज तक’च्या हाती लागला आहे, ज्यात तो स्वतः कबूल करतोय की, केवळ सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा कट रचला गेला नव्हता, तर मुसेवालाच्या हत्येनंतर बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांना धमकीचे पत्र पाठवून दहशत निर्माण करण्याचा प्लॅन होता.
गँगस्टर सौरभ महाकालच्या दाव्यानंतर मुंबई पोलिसांना अजून अशी कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये. लॉरेन्स टोळीतील लोक बॉलिवूडमध्ये आपली दहशत पसरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. महाकालने पोलिसांसमोर अनेक खुलासे केले आहेत. महाकाळने दिलेला कबुलीजबाब कितपत खरा आहे याची चौकशी पोलीस करत आहेत.
‘करण जोहर’कडून पाच कोटी खंडणी मागण्याचे प्लॅनिंग
सलमान खान धमकावण्याचे कसे प्लॅनिंग सुरु होते याबाबतही महाकालने सांगितले आहे. त्याने दिलेल्या जबाबानुसार प्रशांत सिंग राजपूत, संजय शर्मा, विक्रम ब्रार, मोनू जाट आणि अरुण जाट हे करण जोहरकडून 5 कोटींची खंडणी मागणार होते, हे सर्व लॉरेन्स बिश्नोई टोळीचे गुंड आहेत.