कर्जबाजारी होण्यापासून वाचवा ! हॉटेल असोसिएशनचं महापालिका आयुक्तांना साकडं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे राज्यात लॉकडाउन आणि अनलॉकवरुन गोंधळ सुरु असताना, हॉटेल आणि बार मालकांच्या संघटनेने महापालिका आयुक्तांकडे Hospitality industry साठी सवलत देण्याची मागणी केली आहे. मुंबईतील हॉटेल आणि बार सुरु करण्याची मागणी संघटनेने केली असून सध्याच्या परिस्थिती हॉटेल सुरु राहण्याच वेळ रात्री ११ वाजेपर्यंत वाढवून देण्यात यावी अशीही मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

“पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाउनचा विचार केला असता Hospitality industry मध्ये २० लाख जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. प्रत्येक महिन्यात एखादं तरी हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद होत आहे. आतापर्यंत हॉटेल व्यवसायिकांचं २ हजार कोटींचं नुकसान झालंय. सध्याच्या परिस्थितीत जून महिन्याचा अर्धा काळ लॉकडाउनमध्येच जाणार असल्यामुळे हे नुकसान आणखी १ हजार कोटीने वाढू शकतं. राज्यात सध्या २ लाखांच्या घरात रेस्टॉरंट आणि १० हजाराच्या वर हॉटेल्स आहेत. यावर ३० लाख लोकांचा रोजगार हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जोडला गेला आहे. या सर्वांना लॉकडाउनचा मोठा फटका बसतो आहे”, अशी माहिती हॉटेल असोसिएशनने मुंबई तक शी बोलताना दिली.

लॉकडाउन काळात आमच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झालाय. प्रत्येक वेळी लॉकडाउनचा निर्णय झाला की या नुकसानामध्ये भरच पडते आहे आणि कर्जाचा डोंगर वाढतोय. आतापर्यंत अशी कोणतीही आकडेवारी समोर आली नाही की ज्यात हॉटेल आणि रेस्टॉरंटमुळे कोरोनाचा प्रसार होतोय असं सिद्ध झालंय. मुंबईत सध्या रुग्णांचा पॉजिटीव्हीटी रेट हा १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे Hospitality industry ला कर्जबाजारी होऊ द्यायचं नसेल तर आम्हाला आता सवलती मिळणं गरजेचं आहे. महापालिका आयुक्तांकडे आम्ही याची मागणी करत आहोत. हॉटेल आणि बारमालक संघटनेचे अध्यक्ष शेरी भाटीया यांनी ही माहिती दिली.

हे वाचलं का?

यावेळी लॉकडाउन काळात प्रॉपर्टी टॅक्स, वीज बिलात सवलत, पाण्याचं बिल यामधूनही हॉटेल आणि बारमालकांना सवलत देणं गरजेचं असल्याचंही भाटीया यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT