ऐन दिवाळीत डोंबिवलीत जमावबंदीचं कलम 144 लागू, आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई

मुंबई तक

मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी डोंबिवली : दिवाळीच्या दिवशी फडके रोड आणि नेहरू रोड तसेच डोंबिवली शहराच्या अन्य ठिकाणी एकत्रपणे गर्दी करू नका तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरुन सामाजिक अंतर राखून रोगाचा प्रादुर्भाव टाळा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच सीआरपीसी कलम 144 लागू असून जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. आदेशाचे उलंघन केल्यास कठोर कायदेशीर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी

डोंबिवली : दिवाळीच्या दिवशी फडके रोड आणि नेहरू रोड तसेच डोंबिवली शहराच्या अन्य ठिकाणी एकत्रपणे गर्दी करू नका तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरुन सामाजिक अंतर राखून रोगाचा प्रादुर्भाव टाळा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच सीआरपीसी कलम 144 लागू असून जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. आदेशाचे उलंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ऐन दिवाळीत डोंबिवलीमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही तरूणांना मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर न जमता दिवाळी साजरी करावी लागणार आहे.

सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपले मित्रांना शुभेच्छा देण्यासाठी पहाटे तरूण, तरूणी डोंबिवलीच्या फडके रोडवर, टिळक रोड आणि परिसरात जमतात. तसेच दिवाळी पहाट आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मात्र, यावर्षीही हे कार्यक्रम करता येणार नाहीत असे आदेशच पोलिसांनी काढले आहेत. याबाबत डोंबिवली शहरात पोलिसांनी बॅनर लावले आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की दिवाळी निमित्ताने फडके रोड येथे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.

काय म्हटलं आहे पोलिसांनी?

डोंबिवली शहरातील समस्त नागरिकांना कळविण्यात येते की, मार्च 2020 पासून आपण सर्वजण कोव्हिड 19 या रोगाशी समर्थपणे मुकाबला करीत दैनंदीन जीवन जगत आहोत. दिवाळी पहाटच्या निमित्ताने फडके रोड येथे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत. दिवाळीच्या पूर्वी खरेदीसाठी तसेच दिवाळीच्या दिवशी नेहरु रोड, फडके रोड तसेच डोंबिवली शहराच्या अन्य ठिकाणी एकत्रपणे गर्दी करुन जमू नका, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरुन तसेच, सामाजिक अंतर राखून रोगाचा प्रादुर्भाव टाळा. ठाणे शहर यांचे आदेशानुसार आयुक्तालयात सीआरपीसी कलम 144 प्रमाणे लागू असून जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. सदर मनाई आदेशाचे उलंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. कृपया यंदाचा दिवाळी सण हा आपण सर्वांनी कोव्हिड 19 चे नियमांचे पालन करुन पोलीसांना सहकार्य करा.

हे वाचलं का?

    follow whatsapp