फडणवीसांनी ज्या सरकारी वकिलावर आरोप केले पाहा त्याच प्रवीण चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई: ‘महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना..’ असं एक स्टिंग ऑपरेशनच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलं. ज्यामध्ये राज्य सरकारला हादरवून टाकणारे असे प्रचंड Video सादर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये थेट सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांच्यावर देखील फडणवीसांनी गंभीर आरोप केले आहेत. याच आरोपानंतर सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी मुंबई Tak सोबत बोलताना या सर्व […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना..’ असं एक स्टिंग ऑपरेशनच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केलं. ज्यामध्ये राज्य सरकारला हादरवून टाकणारे असे प्रचंड Video सादर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये थेट सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांच्यावर देखील फडणवीसांनी गंभीर आरोप केले आहेत. याच आरोपानंतर सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांनी मुंबई Tak सोबत बोलताना या सर्व आरोपांबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
पाहा वकिल प्रविण चव्हाण नेमकं काय म्हणाले:
‘हे पाहा सरकार माझं नाहीए. मी सरकारमध्ये कधीही नाहीए. माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य हा राजकारणी किंवा त्यांच्या जवळचा नाहीए. राजकारणामध्ये सुद्धा नाहीए. माझ्या पूर्ण कालावधीत साधा ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल किंवा आमदार-खासदार या कोणत्याही निवडणुकांमध्ये मी नाहीए. त्यामुळे सरकारशी माझा संबंध असण्याचा माझा प्रश्नच येत नाही.’
‘हे सर्व टेम्परिंग आहे किंवा जो काही आवाज वैगरे आहे ते आज नाही तर उद्या बाहेर येणारच आहे ना. हे पाहा माझं म्हणणं असं आहे की, अजून व्हीडिओ पाहिलेला नाही. मी त्यातील ऑडिओ अद्याप ऐकलेले नाहीत. दुसरी बाब त्यात अशी आहे की, यातील जो काही आवाज वैगरे आहे ते पोलीस नाही तर फॉरेन्सिक डिपार्टमेंट तपासतं.’