पूजा चव्हाण प्रकरणी मंत्री संजय राठोडांबाबत गृहमंत्री काय म्हणाले?
नागपूर: पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे. याप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांची पोलीस चौकशी व्हावी अशी विरोधकांनी जोरदार मागणी लावून धरली आहे. या सगळ्याबाबत आज (15 फेब्रुवारी) गृहमंत्र्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. संजय राठोड यांच्याबाबत नियमानुसार चौकशी होणार’ अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. पाहा नेमकं काय म्हणाले […]
ADVERTISEMENT
नागपूर: पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे. याप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांची पोलीस चौकशी व्हावी अशी विरोधकांनी जोरदार मागणी लावून धरली आहे. या सगळ्याबाबत आज (15 फेब्रुवारी) गृहमंत्र्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. संजय राठोड यांच्याबाबत नियमानुसार चौकशी होणार’ अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
पाहा नेमकं काय म्हणाले अनिल देशमुख
‘कोणाच्या दबावाचा प्रश्नच नाही. संजय राठोड यांच्याबाबत नियमानुसार चौकशी होणार. जे काही चौकशीमध्ये समोर येईल त्यानुसार पुढील निर्णय राज्य शासन घेईल. मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं आहे की, व्यवस्थित नियमानुसारच चौकशी होणार. जे काही विरोधी पक्ष ज्या पद्धतीने आरोप करत आहेत त्यामध्ये काहीही तथ्य नाही. आमचं जे पोलीस खातं आहे, पुण्याचे पोलीस आहेत ते योग्यरित्या तपास करत आहेत. संजय राठोड हे कुठे आहेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी गृहखात्याचा मंत्री म्हणून जे काही सत्य असेल ते महाराष्ट्राला माहित होईल. नियमानुसार कारवाई होईल. एकदा चौकशीचा निर्णय पुढे आल्यानंतर राज्य शासन निर्णय घेईल.’ अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोडांवर करण्यात येणाऱ्या आरोपावर दिली आहे.
हे वाचलं का?
पूजा चव्हाबाबतची ही बातमी आपण पाहिलीत का?: आठ दिवसांपासून गाजत असलेलं पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आहे काय?
नेमकं प्रकरण काय?
ADVERTISEMENT
पूजा चव्हाण ही टिकटॉक आणि सोशल मीडियावर फेमस असलेली मुलगी होती. 22 वर्षांची पूजा चव्हाण ही मूळची परळीची होती. पुण्यात ती शिकण्यासाठी आणि इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स करण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात वास्तव्य करत होती. मागील रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तिने सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. पुण्यातल्या हेवन पार्क या इमारतीत ती वास्तव्य करत होती याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तिने उडी मारली. जखमी अवस्थेतल्या पूजाला रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. पूजाच्या आत्महत्येनंतर कोणतीही सुसाईड नोट अथवा मेसेज असं सापडल्याची माहिती अद्याप पोलिसांनी दिलेली नाही.
ADVERTISEMENT
त्यानंतर तिच्या आत्महत्येचं प्रकरण सोशल मीडिया, प्रसारमाध्यमं सगळीकडेच गाजू लागलं आहे. पूजा चव्हाण ही सोशल मीडियावर बरीच Active होती कारण ती टिकटॉक स्टार होती. तिच्या मृत्यूनंतर ऑडिओ सुमारे 12 ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आणि त्यानंतर भाजपने संजय राठोड यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT