गाडीतील शिवरायांची मुर्ती पाहून पुढे जाऊ दिले नाही; तिरुपती बालाजीच्या चेकपोस्टवरती नेमकं काय घडलं?
तिरुमाला चेकपोस्टवर माझ्या गाडीतील शिवाजी महाराजांची मूर्ती पाहून मला पुढे जाऊ दिलेनाही, असा दावा एका व्यक्तीने वायरल व्हिडीओमध्ये केला आहे. सध्या हा व्हिडीओसमाजमाध्यमावर मोठ्याप्रमाणात वायरल होत असून या घटनेमुळे शिवप्रेमींमधून संतापव्यक्त केला जात आहे. 1 मिनिट 29 सेकंदाचा हा वायरल व्हिडीओ आहे. काय आहे दावा? मी तिरुपती बालाजीला आहे. तिरुमालाला मला जायचं होतं. मात्र, तिरुमाला […]
ADVERTISEMENT

तिरुमाला चेकपोस्टवर माझ्या गाडीतील शिवाजी महाराजांची मूर्ती पाहून मला पुढे जाऊ दिलेनाही, असा दावा एका व्यक्तीने वायरल व्हिडीओमध्ये केला आहे. सध्या हा व्हिडीओसमाजमाध्यमावर मोठ्याप्रमाणात वायरल होत असून या घटनेमुळे शिवप्रेमींमधून संतापव्यक्त केला जात आहे. 1 मिनिट 29 सेकंदाचा हा वायरल व्हिडीओ आहे.
काय आहे दावा?
मी तिरुपती बालाजीला आहे. तिरुमालाला मला जायचं होतं. मात्र, तिरुमाला चेकपोस्टवरमला माझ्या गाडीतील शिवाजी महाराजांची मूर्ती पाहून थांबवण्यात आले. मूर्ती काढा नाहीतरपुढे जाऊ देणार नाही, असे मला चेकपोस्टवर सांगण्यात आले, असा दावा संबंधित व्यक्तीनेकेला आहे. शिवाजी महाराजांपेक्षा माझ्यासाठी कोणी मोठं नाही, मी मूर्ती काढू शकणारनाही. म्हणून मी परत चाललो आहे, अशी भूमिका सदरील व्यक्तीने घेतल्याचं व्हिडिओतसांगत आहे.
आपण येथील प्रमुख अधिकाऱ्याला देखील जाऊ देण्याची विनंती केली, मात्र त्यांनीही मलाजाऊ दिले नाही, असं ते सांगतात. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येकाने महाराजांची मूर्ती गाडीतलावून यावे, त्याशिवाय या लोकांना कळणार नाही, असे आवाहन देखील त्या व्यक्तीने केले. त्यामुळे हा व्हिडीओ वायरल करत संताप व्यक्त केला जात आहे.