काँग्रेसचे दिग्गज नेते राजीव सातव व्हेंटिलेटरवर, राहुल गांधींचा पुण्यातील डॉक्टरांना फोन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव (Rajeev Satav) यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. कोरोना (Corona) संसर्गानंतर सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी डॉक्टरांना फोन करुन राजीव सातव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पुण्यात जहाँगीर रुग्णालयात राजीव सातव यांची प्रकृतीबाबत विचारपूस केल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.

कोरोनाची लागण झाल्याने आता राजीव सातव यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. अशीही माहिती विश्वजीत कदम यांनी दिली आहे. राजीव सातव यांना 19 एप्रिलला कोरोनाची लागण झाली होती. 22 एप्रिलाला त्याच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे 25 एप्रिलला त्यांना अधिक त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील जहाँगीर सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमधीले आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं. तसेच तेव्हापासून त्यांच्यावर आवश्यकतेनुसार सर्व उपचार करण्यात आले आहे.दरम्यान, काल त्यांच्या प्रकृतीत काही बिघाड झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सध्या राजीव सातव यांची प्रकृती स्थिर असून ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. त्यांना लवकरात लवकर आराम पडावा यासाठी जहाँगीरमधील डॉक्टरांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, मला खात्री आहे ते लवकर बरे होतील. कुटूंबातील सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वांच्या प्रार्थना कामी येतील. अशी प्रतिक्रिया विश्वजीत कदम यांनी दिली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अतिशय जवळचे अशी राजीव सातव यांची काँग्रेसमध्ये ओळख आहे. 2014 साली हिंगोलीचे खासदार म्हणून राजीव सातव हे पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. पण 2019 साली त्यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. पण मागील वर्षी राज्यसभेच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळी सातव यांची तिथे वर्णी लागली होती.

ADVERTISEMENT

45 वर्षी राजीव सातव हे यांच्यावर अनेकदा राहुल गांधी यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. मागील काही वर्षापासून गुजरातचे काँग्रेस कमिटीचे प्रभारी देखील होते. 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सातव यांनी काँग्रेसची चांगली मोट बांधली होती. त्यामुळेच काँग्रेसला गुजरातमध्ये चांगलं यश मिळालं होतं. गुजरातमध्ये काँग्रेसला सत्ता काबीज करता आली नव्हती. मात्र, यावेळी त्यांची आमदारांची संख्या लक्षणीयरित्या वाढली होती.

ADVERTISEMENT

दरम्यान, 2010 ते 2014 साली राजीव सातव हे भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्षही होते. यावेळी त्यांनी बरंच चांगलं काम केलं होतं. त्यामुळे ते राहुल गांधींच्या अधिक जवळ पोहचले होते. (senior congress leader rajeev satav testing positive for covid 19 was put on ventilator support)

    follow whatsapp

    ADVERTISEMENT