Pune Crime : जेवणातून गुंगीचं औषध देत नोकराने २४ लाखांचा ऐवज लांबवला
पुणे : येथील मुंढवा परिसरात नोकरानं जेवणातून गुंगीच औषध देत २४ लाखांचा ऐवज लांबवला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील पिंगळे वस्तीत राहणार्या एका ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या घरी हा प्रकार घडला. लांबवलेल्या ऐवजामध्ये २८ तोळं सोनं आणि हिर्याचे दागिने आणि काही रोख रक्कम अशी एकूण २३ लाख ९८ हजार रुपये किंमतीच्या ऐवजाचा समावेश […]
ADVERTISEMENT
पुणे : येथील मुंढवा परिसरात नोकरानं जेवणातून गुंगीच औषध देत २४ लाखांचा ऐवज लांबवला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील पिंगळे वस्तीत राहणार्या एका ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या घरी हा प्रकार घडला. लांबवलेल्या ऐवजामध्ये २८ तोळं सोनं आणि हिर्याचे दागिने आणि काही रोख रक्कम अशी एकूण २३ लाख ९८ हजार रुपये किंमतीच्या ऐवजाचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, विपीन हून आणि जसमीत हून हे ज्येष्ठ नागरिक पिंगळे वस्ती परिसरातील एका सोसायटीमध्ये वास्तव्यास आहेत. दोघेही ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांच्या घरी नरेश शंकर सौदा (वय-२२) यास महिन्याभरापूर्वी २४ तासासाठी कामासाठी घेतलं होतं. संशयित आरोपी नरेश याने महिन्याभरात सर्व माहिती करुन घेतली.
त्यानंतर रविवारी रात्री संशयित नरेशने विपीन हून आणि जसमीत हून यांना जेवण दिलं. मात्र या जेवणात त्यानं गुंगीचं औषध टाकलं होतं. त्यामुळे दोघांना अवघ्या काही मिनिटात झोप लागली. त्यानंतर नरेशने कपाटामधील सोने, हिर्याचे दागिने (२८६ ग्रॅम वजन) आणि काही रोख रक्कम असा एकूण २३ लाख ९८ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास करत पसार झाला.
हे वाचलं का?
विपीन हून आणि जसमीत हून या दोघांना सकाळी जाग आल्यानंतर चोरी झाल्याचं लक्षात आलं. यानंतर त्यांची मुलगी प्रिती हून यांनी याबाबत फिर्याद दाखल केली असून त्या आधारे पोलिसांनी संशयित नरेश शंकर सौदा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती मुंढवा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शिवाजी काटे यांनी दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT