कोण आहे रवी?, ज्याच्याकडे शाहरुखने सोपवली होती आर्यनला घरी आणण्याची जबाबदारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबईहून गोव्याला जात असलेल्या क्रूझवरुन बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अटक केली होती. आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईतील टर्मिनलमधून ताब्यात घेतले होते त्यानंतर 2 ऑक्टोबर रोजी चौकशीनंतर त्याला अटकही केली होती. दरम्यान, आता तब्बल 28 दिवसांनी आर्यन खानची तुरुंगातून सुटका झाली आहे.

ADVERTISEMENT

आर्यनच्या याच सुटकेकडे गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांचंच लक्ष लागून राहिलं होतं. अखेर आता आर्यन मुंबईच्या आर्थर जेलमधून मन्नतमध्ये पोहचला आहे. पण या अगदी महत्त्वाच्या क्षणी शाहरुखने अगदी महत्त्वाची जबाबदारी ही त्याचा अंगरक्षक रवी याच्याकडे सोपवली होती. जाणून घेऊया नेमकं याचविषयी सविस्तरपणे.

कोण आहे शाहरुखचा अंगरक्षक रवी?

हे वाचलं का?

आर्यन खानला मुंबईच्या आर्थर रोड जेलमधून घरी आणण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी शाहरुख खानने आपला अंगरक्षक रवी याच्यावर सोपवली होती. एवढी महत्त्वाची जबाबदारी सोपवलेला रवी नेमका आहे तरी कोण? हेच आता आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

रवी सिंग हा सुपरस्टार शाहरुख खानचा खासगी अंगरक्षक आहे. रवी सिंग शाहरुख खानसोबत प्रत्येक क्षणी सावलीसारखा असतो. रवी शाहरुखची सुरक्षा उत्तम राहील याची पूर्ण काळजी घेतो. रवी गेल्या दशकभरापासून शाहरुख खानसोबत आहे. चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अंगरक्षकांमध्ये त्यांची गणना होते.

ADVERTISEMENT

बॉडीगार्ड रवी सिंगचा नेमका पगार किती?

ADVERTISEMENT

रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानचा पर्सनल बॉडीगार्ड रवी सिंगचा पगार हा वर्षाला तब्बल 2.7 कोटी रुपये एवढी आहे. रवी सिंगला कॅमेऱ्यासमोर येणे आवडत नाही. त्याला लाइमलाइटपासून दूर राहणंच पसंत आहे. पण तरीही त्याचे अनेक फोटो हे शाहरुखसोबत पाहायला मिळतात.

शाहरुखसोबत गेली अनेक वर्ष असलेला रवी सिंग हा त्याचा अत्यंत विश्वासू माणूस समजला जातो. त्यामुळे रवी सिंग यालाच शाहरुखने आर्यनला घरी आणण्याची जबाबदारी सोपवली होती.

आर्यन तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मीडिया आणि चाहत्यांची प्रचंड गर्दी असणार ही गोष्ट शाहरुखला माहिती होती आणि म्हणूनच आर्यनला कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी शाहरुखने आपला विश्वासू रवी सिंग याला आर्थर जेल येथे पाठवलं होतं.

अखेर आर्यन खानची ‘मन्नत’वर घरवापसी; शाहरूख खानच्या घराबाहेर चाहत्यांचा जल्लोष

दरम्यान, 2014 मध्ये रवीबद्दल एक बातमी समोर आली होती. त्यानुसार त्याला वांद्रे-कुर्ला पोलिस स्टेशनमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. प्रवेश पत्रिका असूनही मराठी अभिनेत्री शर्वरी हिला अवॉर्ड शोमध्ये बॅकस्टेजवर जाऊ न दिल्याचा आरोप रवीवर करण्यात आला होता.

गर्दीला हाताळताना रवीने शर्वरीला धक्काबुक्की केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी पोलिसांनी रवीला फक्त समज देऊन सोडून देण्यात आलं होतं. त्यावेळी त्याच्याविरुद्ध कोणताही एफआयआर नोंदवण्यात आलेला नव्हता. याव्यतिरिक्त रवीबाबत फारशी कधीच चर्चा झाली नव्हती. मात्र, आता तो पुन्हा चर्चेत आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT