शंभुराज देसाईंनी केली आजी-माजी मुख्यमंत्र्यांची तुलना, ठाकरेंना काढले चिमटे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात सत्तांतर झाल्यानंतर उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाईंनी ठाकरे-शिंदे अशा दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीची तुलना करत उद्धव ठाकरेंना चिमटे काढले आहेत.

ADVERTISEMENT

शंभुराज देसाईंनी केली आजी-माजी मुख्यमंत्र्यांची तुलना

मागच्या काळात वेळ मागून भेट मिळत नसल्याची खंत व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये जागेवर निर्णय घेण्याची क्षमता आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीची तुलना करत उत्पादन शुल्क मंत्री शुंभराज देसाईंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. हिंदू गर्व गर्जनेतून आम्ही हिंदुत्वाच्या विचाराशी गद्दारी केली नाही तर हिंदुत्वाच्या विचारांबरोबर प्रतारणा ज्यांनी केली, ज्यांनी युती म्हणून मत मागून मुख्यमंत्री पदासाठी जे केलं त्यांनी स्वत:ला प्रश्न विचारण्याची गरज असल्याचे शंभुराज म्हणाले. शंभुराज देसाई चाकण येथील हिंदू गर्व गर्जना मेळाव्यात बोलत होते.

दसरा मेळाव्यावरुन शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया

राज्यात दसरा मेळावा कुठं आणि कोण घेणार यावरुन राजकारण सुरु असताना शिंदे गटाकडून मुंबईत जिथं प्रशासनाकडून जागा मिळेल तिथं दसरा मेळावा घेणार असून राज्यात राजकारणातील घडलेल्या घडामोडी सविस्तरपणे राज्याचे मुख्यमंत्री मांडणार असल्याचे शंभुराज देसाईंनी स्पष्ट केलं आहे. दसरा मेळाव्यासाठी परवानगी देणा-या यंत्रणांवर ताण येऊ नये यासाठी जिथं परवानगी मिळेल तिकडे दसरा मेळावा घेणार असल्याचे सांगत शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यावर आता सय्यमाची भूमिका घेतली जात असल्याचे पहायला मिळत आहे.

हे वाचलं का?

ठाकरे परिवार आणि शिवसेना हे एक नातं आहे आणि ठाकरे परिवाराला आम्ही आजही त्यांचा मानसन्मान देत असल्याचे स्पष्ट मत शंभुराज देसाईंनी मांडलं आहे. शंभुराज देसाई चाकण येथील हिदुगर्वगर्जना मेळाव्यात आले होते यावेळी माध्यमांशी बोलत होते. रामदास कदम यांच्या वक्तव्यावरुन वाद सुरु असताना या वादावर शंभुराज देसाईंनी पडदा टाकण्याचा प्रयत्न करत रामदासभाईंचा हेतू वेगळा असावा असे मत मांडले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT