Dasara Melava: ‘सर्वसमावेशक भूमिका घ्या…’, शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना सल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: शिवसेनेचा गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी पार्कवरती होणार दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी सुरु केलेली परंपरा उद्धव ठाकरे पुढे चालवत आहेत, परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यापासून ते उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक गोष्टीला चॅलेंज करत आहेत. शिवसेनेनंतर एकनाथ शिंदे गटाकडून देखील मेळावा घेण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. आता या सर्व वादामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतली आहे आणि एकनाथ शिंदेंना वडिलकीचा सल्ला दिला आहे.

शरद पवारांनी एकनाथ शिंदेंना काय सल्ला दिला?

शरद पवार म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्षाची भूमिका न घेता सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे. त्यांनी सामोपचाराने गोष्टी होतील याकडे लक्ष द्यावं.” विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावरती प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “दसरा मेळ्याच्या सभेनंतर कळेल कुणामागे किती जनता आहे.”

दसरा मेळाव्याबाबत आमदार सदा सरवणकर काय म्हणाले?

‘मुंबई तक’शी बोलताना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर म्हणाले होते ”गेल्या १५ वर्षांपासून दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी म्हणून मी अर्ज करत असतो. तशाच पद्धतीनं मी अर्ज केला आहे. दसरा मेळाव्याला जर परवानगी मिळाली तर त्याला प्रमुख मार्गदर्शन एकनाथ शिंदे करतील. आम्ही शिवसेना म्हणून अर्ज केला आहे त्यामुळे इतर कोणी अर्ज केला आहे याबाबत मला माहित नाही.” दसरा मेळाव्यातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार लोकांपर्यंत जावे ही आमची इच्छा असल्याचंही सदा सरवणकर म्हणाले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राज ठाकरे यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण?

राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे जर दसरा मेळाव्याला व्यासपीठावर दिसले तर त्यात आश्चर्य वाटायला नको, असे म्हणत राज ठाकरे यांना शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना दिले होते.

सरवणकर म्हणाले, जे कोणी हिंदुत्वासाठी एकत्रित आणण्याचे काम शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. यापूर्वीही वेगवेगळ्या पक्षांचे आणि हिंदुत्ववादी विचारांचे नेते शिवसेनेच्या व्यासपीठावर आलेले आहेत. त्यामुळे हे नेते उद्या व्यासपीठावर दिसले तर त्याबाबत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT