औरंगाबादच्या सभेआधीच शरद पवारांचे राज ठाकरेंना तीन प्रश्न, म्हणाले….
मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. त्यांच्या सभेची राज्यभरात चर्चा आहे. अशात या सभेच्या एक दिवस आधीच शरद पवारांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. नाव न घेता त्यांनी राज ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत. काय म्हणाले आहेत शरद पवार? मध्यंतरी एका नेत्याने माझ्यावर टीका केली की मी […]
ADVERTISEMENT

मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. त्यांच्या सभेची राज्यभरात चर्चा आहे. अशात या सभेच्या एक दिवस आधीच शरद पवारांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. नाव न घेता त्यांनी राज ठाकरेंना खडे बोल सुनावले आहेत.
काय म्हणाले आहेत शरद पवार?
मध्यंतरी एका नेत्याने माझ्यावर टीका केली की मी फुले आंबेडकर, शाहूराजा यांचं केवळ नाव घेतो. मी त्यांना विचारू इच्छितो.. फुलेंचं नाव का मी घ्यायचं नाही? ज्यांनी समाजाला सुशिक्षित करण्याचा प्रयत्न केला ज्यांच्या पत्नीने आपलं आयुष्य लोकांच्या शिक्षणासाठी घालवलं त्यांचं नाव घ्यायचं नाही. ज्यावेळी इंग्रज सरकार होतं त्यावेळी इंग्रज राजा महाराष्ट्रात आला होता त्यावेळी ज्योतिबा फुले यांनी स्वतः त्या राजाला एक निवेदन दिल होत त्यामध्ये लिहिलं होतं. दुष्काळ पडला आहे त्यामुळे आम्हाला खडी फोडण्याची शिक्षा देऊ नका. त्यऐवजी राज्यात धरणे बांधा. त्यांना दूरदृष्टी होती.
औरंगाबादमध्ये भोंगे वाजवण्यासाठी मनसे सज्ज, जाणून घ्या काय आहे मनसेचा R प्लान?