Sharad Pawar: सुप्रीम कोर्ट, गिरीश बापट अन् फडणवीस; शरद पवार म्हणाले…
Sharad Pawar Reaction Girish Bapat And Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या मुद्द्यावर त्यांचं मत मांडलं. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मधील पहाटेच्या शपथविधीबद्दल केलेल्या विधानावरून पवारांनी टोला लगावला. पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापटही कसबा पेठ पोटनिवडणुकीत प्रचारात उतरले. त्यांची प्रकृती बरी नसताना ते […]
ADVERTISEMENT
Sharad Pawar Reaction Girish Bapat And Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या मुद्द्यावर त्यांचं मत मांडलं. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी 2019 मधील पहाटेच्या शपथविधीबद्दल केलेल्या विधानावरून पवारांनी टोला लगावला. पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापटही कसबा पेठ पोटनिवडणुकीत प्रचारात उतरले. त्यांची प्रकृती बरी नसताना ते प्रचारात आल्यानं विरोधकांकडून आता भाजपला लक्ष्य केलं जात आहे. पवारांनीही यावर बोलताना चिंता व्यक्त केली. (Sharad pawar Reaction on Maharashtra Political Crisis and devendra fadnavis statement)
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात सुनावणी; पवार म्हणाले, ‘इंटरेस्टिंग आहे’
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून, सर्वोच्च न्यायालयाने 7 सदस्यीय घटनापीठाकडे नबाम रबिया निकाल फेरविचार करण्यासाठी पाठवायचा का? यावर सखोल सुनावणीची गरज व्यक्त केली. तसेच 21 फेब्रुवारी रोजी सुनावणीची तारीख निश्चित केली.
यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “मी ऐकलं की मंगळवारी याचा निर्णय घेऊ असा आज ऐकण्यात आलं आहे. बघू आता मंगळवारी काय होतं, इंटरेस्टिंग आहे. काय होतं हे सांगणं अवघड आहे.”
Maharashtra Political Crisis in SC : सुप्रीम कोर्टाने काय दिला निर्णय?
हे वाचलं का?
कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणूक : शरद पवार दोन्ही मतदारसंघात जाणार
माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, “कसबा पोटनिवडणुकीसाठीचे उमेदवार मला भेटून गेले आहेत. त्यांनी मला एखादी चक्कर टाका असे सांगितले आहे. आता एका ठिकाणी गेलं की दोन्ही ठिकाणी जावं लागेल (कसबामध्ये गेलं, तर चिंचवडमध्ये पण जावं लागेल)”, अशी माहिती पवारांनी दिली.
शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा
शरद पवारांशी चर्चा करूनच 2019 मधील पहाटेचा शपथविधी झाला होता, असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा पवारांना विचारण्यात आलं. शरद पवार म्हणाले, “त्या विषयावर भाष्य करून त्यांचे (देवेंद्र फडणवीस) आणखी महत्त्व वाढवावं असे मला वाटत नाही. त्यांनाच विचारायची गरज आहे की इतक्या दिवसांनी हे वक्तव्य का काढलं?”, असं म्हणत पवारांनी फडणवीसांना चिमटा काढला.
ADVERTISEMENT
Prakash Ambedkar: ‘लग्न लावायचं गंगूशी अन् संसार…’, आंबेडकरांची पवारांवर घणाघाती टीका
ADVERTISEMENT
कसबा पेठ पोटनिवडणूक : गिरीश बापटांची प्रचारात एंट्री, पवार म्हणतात…
कसबा पेठ पोटनिवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होताना दिसत आहे. भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. त्यांची प्रकृती बरी नसताना ते भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरले. बापट गंभीर आजारी असताना त्यांना प्रचारात उतरवल्यावरून विरोधकांनी टीका केलीये. पवारांनीही यावर भूमिका मांडली.
Sharad Pawar: ‘फडणवीस सभ्य माणूस पण..’ पहाटेच्या शपथविधीवरुन पवारांनी सुनावलं
पवार म्हणाले, “त्यांना प्रचारात आणणे, हे भाजपला गरज होती का ठाऊक नाही. गिरीश बापट यांना मी भेटून आलो होतो. त्यांची प्रकृती पाहता त्यांच्या यातना वाढू नये हीच अपेक्षा आहे”, अशी चिंता पवारांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT