शरद पवारांचं नागपुरात सोशल इंजिनिअरिंग; मुस्लिम समुदायासोबतच्या बैठकीत काय म्हणाले?
लोकसभा आणि राज्यातली विधानसभेची निवडणूक अजून बरीच लांब असली, तरी अधिकाधिक जनसमर्थन मिळवण्याचे प्रयत्न राजकीय पक्षाकडून सुरू झालेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मशीद भेटीची आणि त्यांच्याकडून केलेल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या विधानांचा अर्थ सोशल इंजिनिअरिंगच्या दृष्टीने लावला जात आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही सोशल इंजिनिरिंग साधण्याचे प्रयत्न करत असल्याची चर्चा त्यांच्या […]
ADVERTISEMENT
लोकसभा आणि राज्यातली विधानसभेची निवडणूक अजून बरीच लांब असली, तरी अधिकाधिक जनसमर्थन मिळवण्याचे प्रयत्न राजकीय पक्षाकडून सुरू झालेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मशीद भेटीची आणि त्यांच्याकडून केलेल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या विधानांचा अर्थ सोशल इंजिनिअरिंगच्या दृष्टीने लावला जात आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही सोशल इंजिनिरिंग साधण्याचे प्रयत्न करत असल्याची चर्चा त्यांच्या नागपूरमधील भूमिकांवरून केली जात आहे.
ADVERTISEMENT
शरद पवार यांची शनिवारी नागपुरात मुस्लिम इंटेलेक्च्युअल फोरमसोबत बैठक झाली. या बैठकीत मुस्लिम समुदायातील हजारो बुद्धिजीवी लोक उपस्थित होते. या लोकांनी शरद पवारांसमोर समस्या मांडल्या. अडचणी ऐकून घेतानाच आपण पुन्हा १५ दिवसांनी नागपुरात येऊ आणि आपले हक्क मिळवण्यासाठी मार्गदर्शन करू, त्याचबरोबर मुस्लिम समुदायासोबत असू, असं पवार म्हणाले.
याच बैठकीत बोलताना पवार म्हणाले की, ‘आज देशात कला, साहित्य आदी क्षेत्रात योगदान देण्याचं क्षमता अल्पसंख्याक समुदायामध्ये आहे. बॉलिवूडला आज संपूर्ण जग ओळखतं. बॉलिवूडमध्ये आज सर्वाधिक योगदान मुस्लिम अल्पसंख्याक समुदायाचं आहे. त्यांना पाठबळ हवंय आणि समान अधिकार मिळण्याची गरज आहे.
हे वाचलं का?
भटके विमुक्त जमाती संघटनेच्या अधिवेशनात शरद पवार काय म्हणाले?
शरद पवार अधिवेशनात बोलताना म्हणाले, ‘भटके विमुक्त जमाती संघटनांनी ५० वर्षे कष्ट केलेय. त्याचं स्मरण करतोय. एक काळ असा होता की, हा समाज गुन्हेगारी आहे, असा उल्लेख केला जायचा. १९५२ साली त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भटक्या विमुक्तांवरचा गुन्हेगारी ठप्पा पुसला. भटक्या विमुक्त समाजाची शोषणापासून मुक्ती झालीये, असं आजही वाटत नाही. यातून मुक्तीसाठी शक्तीशाली संघटना उभी करावी लागेल”, असं पवार म्हणाले.
“शाहू महाराजांनी लहान समाजाला सन्मान देण्यासाठी अनेक गोष्टी केल्या. त्यांचे मार्ग वेगळे होते, काही लोकांना ते आवडले नाही. भटक्यांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी एकसंघ झाल्याशिवाय पर्याय नाही. संघटनेची शक्ती तुम्हाला सन्मानाने जगण्याचा आधार देईल. या अन्याय अत्याचार करणाऱ्या शक्ती विरोधात मशाली पेटवल्या पाहिजे”, असं पवार म्हणाले.
ADVERTISEMENT
Mohan Bhagwat: जात आणि वर्ण व्यवस्था हा भूतकाळ, तो विसरून गेला पाहिजे
ADVERTISEMENT
मोहन भागवतांच्या विधानांचीही चर्चा
सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीतल्या अरशद मदनी मशिदीला भेट दिली होती. त्यानंतर नागपुरात पार पडलेल्या विजयादशमीच्या कार्यक्रमात मुस्लिमांसोबत संवाद वाढवण्याच्या मुद्द्यावर जोर दिला होता. इतकंच नाही, तर नागपूरमध्ये झालेल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात मोहन भागवतांना ब्राह्मणांनी पापक्षालन करायला हवं असं सांगतानाच वर्ण व जातीव्यवस्था आता भूतकाळ झाला आहे. कुणालाही विषमता नकोय. हीच सर्वाच्या मनातील गोष्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत समाविष्ट केली. ती आपण स्वीकारली आणि त्यानुसार आपण आचरण करण्याचा जोरकसपणे प्रयत्न करित आहोत, असं म्हटलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT