राज्यातील सत्तांतरानंतर शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात
महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि ठाणे चर्चेच्या केंद्रस्थानी आलं. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात दिवसभर दौरा करणार आहेत. ठाण्याच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांना सोबत घेत शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्याबाबत शरद […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि ठाणे चर्चेच्या केंद्रस्थानी आलं. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात दिवसभर दौरा करणार आहेत.
ADVERTISEMENT
ठाण्याच्या राजकारणात वर्चस्व असलेल्या एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांना सोबत घेत शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्याबाबत शरद पवार यांनी भाष्य केलं आहे.
महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भाजपनं सत्ता स्थापन केली. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे ठाणे जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांच्याकडे आली असून, त्यामुळे ठाणे जिल्हा सत्तेचं केंद्रबिंदू बनला आहे.
हे वाचलं का?
ठाणे जिल्ह्यात शिवसेनेत दोन गट (शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना) पडले आहेत. त्यात महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे वेध राजकीय पक्षांना लागले असून, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षबांधणी सुरू केली आहे.
शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघेंना ‘त्या’ प्रकरणात दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर
ADVERTISEMENT
शरद पवार महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीसंदर्भात घेणार बैठका
सोमवारी (२९ ऑगस्ट) शरद पवार दिवसभर ठाणे जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. काही ठिकाणी ते कार्यकर्त्यांशीही संवाद साधणार आहे. शरद पवाराच्या एकदिवसीय ठाणे दौऱ्याचं नियोजन माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे-पालघर जिल्ह्यांचे समन्वयक आनंद परांजपे हे करणार आहेत.
ADVERTISEMENT
ठाणे महापालिकेसह जिल्ह्यातील विविध महापालिका आणि नगरपालिकांसाठी आगामी काळात निवडणुका होणार आहेत. या निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली असून, नुकत्याच झालेल्या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने राजकीय पक्षांनी शक्तीप्रदर्शन करण्याची संधी सोडली नाही.
आज सकाळी मुंबईवरून पुणे.3 तास द्राक्ष बागायतदार संघाचे अधिवेशन. 5 ते 7 फ.मु. शिंदेंचा कार्यक्रम
7 ला पुण्यातून निघून मुंबई
आत्ता वाजलेत बारा आणी तरीही मॅच बघून भारत विजयी झाल्यानंतरचा हा आनंदोत्सव.कुठून येत असेल इतकी उर्जा ह्या 82 वर्षाच्या तरूणाकडे काय माहीत!उद्या ठाणे pic.twitter.com/B1Vk6NCL3W
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 28, 2022
ठाणे जिल्ह्यात भाजपचंही लक्ष
ठाणे महापालिकेसह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खूप आधीपासूनच तयारी सुरू केलीये. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार निवडून आणण्याची चंग भाजपनं बांधला होता. मात्र, सत्तांतरानंतर भाजप शिंदे गटातील खासदारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे.
Shivsena : ठाण्यात सेनेला मोठा धक्का, ६६ माजी नगरसेवक शिंदे गटात
असं असलं तरी ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनंही ठाणे जिल्ह्यात लक्ष घातल्याचं दिसत आहे. शरद पवारांच्या आजच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे हेही ठाण्यातूनच त्यांच्या महाप्रबोधन यात्रेची सुरूवात करणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT