Shashikant warishe: अजित पवारांनी दाखवली जाहिरात; देवेंद्र फडणवीस म्हणाले..

मुंबई तक

Shashikant warishe Murder Case, Ajit Pawar, Devendra Fadnavis : रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांची गाडीखाली चिरडून हत्या करण्यात आली. हे प्रकरण विधानसभेत चर्चेला आलं. अजित पवारांनी सभागृहात पंढरीनाथ आंबेरकरच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या जाहिरातीच सभागृहात दाखवल्या. आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. पंढरीनाथ वारिशे हत्या प्रकरण : विधानसभेत काय झाली चर्चा? भाजप […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Shashikant warishe Murder Case, Ajit Pawar, Devendra Fadnavis : रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिशे यांची गाडीखाली चिरडून हत्या करण्यात आली. हे प्रकरण विधानसभेत चर्चेला आलं. अजित पवारांनी सभागृहात पंढरीनाथ आंबेरकरच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या जाहिरातीच सभागृहात दाखवल्या. आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.

पंढरीनाथ वारिशे हत्या प्रकरण : विधानसभेत काय झाली चर्चा?

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणाचा मुद्दा सभागृहात मांडला. “एसआयटीमार्फत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली गुन्ह्याचा तपास सुरू आहे, मग वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणत्या स्तरावरील आहे? आणि या प्रकरणाची एसआयटी चौकशी कधीपर्यंत पूर्ण होणार, दोषींना कधीपर्यंत शिक्षा होणार?”, असे प्रश्न भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला होता.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एसआयटीची 16 लोकांची टीम काम करत आहे. भारतीय पुरावा कायदा आहे. त्यानुसार पुरावे गोळा करण्यासाठी बाहेरच्या टीम नियुक्त करता येतात. त्यानुसार टीम नियुक्त केल्या आहेत. एसपी आणि आयजी यांचं परिवेक्षण करत आहेत. दोघांचे मोबाईल जप्त झालेले आहेत. त्यांचं फॉरेन्सिक ऑडिट केलं आहे. किती दिवसांत होईल सांगता येणार नाही. लवकरात लवकर निष्कर्षापर्यंत पोहोचू.”

Bhaskar Jadhav: “शंभर बापाची औलाद नसशील, तर…”, मोहित कंबोज- देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज

हे वाचलं का?

    follow whatsapp