शिल्पा शेट्टी-राज कुंद्रानं शर्लिन चोप्राविरुद्ध दाखल केला 50 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा!

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी शर्लिन चोप्राने मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली असून, तिने राज कुंद्रा बलात्कार, लैगिंक शोषणासह फसवणुकीचे आरोप केले आहेत. शर्लिन चोप्राने केलेल्या आरोपानंतर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

ADVERTISEMENT

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राने शर्लिन चोप्राविरुद्ध 50 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्याचबरोबर शर्लिन चोप्राने केलेले आरोप निराधार आणि खोटे असल्याचं सांगत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

मुख्यमंत्रीजी, मी तुमच्या मुलीसारखी, मला मदत करा; शर्लिन चोप्राने उद्धव ठाकरेंना जोडले हात

हे वाचलं का?

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शर्लिन चोप्राने एक व्हिडीओ ट्वीट करत शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर गंभीर आरोप केले होते. तिने या व्हिडीओमध्ये घटनाक्रम सांगितला होता. तसेच जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रकरणाचा तपास सुरू करण्याची विनंती केली होती.

शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. राज कुंद्राने आपल्या बलात्कार केल्याचं तसंच लैंगिक शोषण करुन अंडरवर्ल्डची धमकी दिल्याचाही आरोप केलेला आहे.

ADVERTISEMENT

शर्लिन चोप्राने केलेल्या आरोपानंतर शिल्पा शेट्टीने थेट न्यायालयात धाव घेतली आहे. शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या वकिलाने शर्लिन चोप्रावर 50 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या वकिलांना अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून याची माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

Pornography Case : राज कुंद्राने HotShot App वर बिनधास्त काम कर असा आग्रह धरला होता-शर्लिन चोप्रा

‘शर्लिन चोप्राने शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यावर जे काही आऱोप केले आहेत, ते सर्व खोटे आहेत. तथ्यहीन आणि निराधार आहेत. या आरोपांना कसलाही आधार नाही’, असं शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांच्या वकिलाने निवेदनात म्हटलेलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT