… यासाठी भेटले ठाकरे-शिंदे गटाचे खासदार, बैठकीत काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शिवसेना फुटली. ठाकरे गट आणि शिंदे गट अस्तित्वात आले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी राजकीय आरोप, कुरघोड्या सुरू आहेत. ठाकरे विरुद्ध शिंदे गट राजकीय संघर्ष दररोज बघायला मिळत असताना दिल्लीत दोन्ही गटांचे खासदार भेटल्याचा एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना असा राजकीय संघर्ष गेल्या काही महिन्यापासून बघायला मिळतोय. सध्या दोन्ही गट सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगात कायदेशीर लढाई देत आहेत. दुसरीकडे नागपूर हिवाळी अधिवेशनातही शिंदे गट आणि ठाकरे गटात संघर्षाच्या ठिणग्या उडताना दिसत आहे.

एकीकडे शिंदे गटाने ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न करत असताना दिल्लीतील एका बैठकीचा व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, प्रियांका चर्तुवेदी, तर शिंदे गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार राहुल शेवाळे दिसत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विधानसभेत अध्यक्षांसाठी अपशब्द वापरणं भोवलं : जयंत पाटील यांचं निलंबन

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाचे खासदाराची बैठक कशासाठी झाली? या प्रश्नांची चर्चा सुरु झाली. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या खासदारांच्या बैठकीत नेहमी काय चर्चा झालीये, याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. त्याबद्दलची माहिती आता समोर आलीये.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

ठाकरे-शिंदे गटाच्या खासदारांच्या बैठकीत काय झालं?

दिल्लीत झालेल्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या बैठकीबद्दल सूत्रांनी माहिती दिली. शिवसेनेत बंडखोरी झाली. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आणि केंद्रीय निवडणूक आयोगात गेलं. अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाने आक्षेप घेतल्यांतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं. हा निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेची सर्व खाती गोठवली गेली आहेत.

Disha Salian Death ची फाईल उघडली, गदारोळानंतर फडणवीसांची मोठी घोषणा

शिवसेनेच्या दिल्लीतील कार्यालयात कर्मचारी कामाला आहेत. शिवसेनेचं खातं गोठवलं गेल्यामुळे या कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. त्या कर्मचाऱ्यांच्या पगार करण्यासाठी शिंदे-ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक झाली. कर्मचाऱ्यांचे पगार कसे द्यायचे याबद्दल या बैठकीत चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT