भरत गोगावलेंचं सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबद्दल विधान; शिंदे गटाने दिलं स्पष्टीकरण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वोच न्यायालयात पोहचला आहे. यावर बोलताना शिंदे गटातील प्रतोद भरत गोगावले यांनी आपलं प्रकरण घटनापीठाकडे गेलं आहे. चार-पाच वर्ष त्याचा काही निकाल लागत नाही, असं विधान केलं होतं. यावर दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गोगावले यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. तसंच न्यायालयाच्या कामकाजाबाबत कुठल्याही आमदारांनी […]
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वोच न्यायालयात पोहचला आहे. यावर बोलताना शिंदे गटातील प्रतोद भरत गोगावले यांनी आपलं प्रकरण घटनापीठाकडे गेलं आहे. चार-पाच वर्ष त्याचा काही निकाल लागत नाही, असं विधान केलं होतं. यावर दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गोगावले यांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. तसंच न्यायालयाच्या कामकाजाबाबत कुठल्याही आमदारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी स्टेटमेंट द्यायचे नाही, अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत, असं देखील केसरकर म्हणाले.
नेमकं भरत गोगावले यांच्या विधानावर काय म्हणाले केसरकर?
शिंदे गटातील प्रवक्ते आणि मंत्री यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली. ज्यात त्यानु प्रामुख्याने गोगावले यांचं न्यायालयाच्या बाबतीत केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. जाहीर सभेमध्ये बोलत असताना भरत गोगावले यांच्याकडून बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीच्या गोष्टी निघाल्या आहेत. सीमा भागाच्या प्रश्नाला न्यायालयात कसा उशीर झाला, याचं संदर्भ देताना सध्याच्या केसशी त्याला जोडला. त्यामुळे चुकीचं चित्र महाराष्ट्रासमोर जाण्याची शक्यता आहे. न्यायालयात वेळ घालवणं किंवा निर्णयाला उशीर व्हावा, अशी आमची भूमिका नाही, असं केसरकरांनी स्पष्ट केलं आहे.
कोर्टात मॅटर सुरु असताना त्याबाबत कुठलंही विधान आमदार किंवा पदाधिकाऱ्यांनी करू नये, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले आहेत, असं केसरकरांनी सांगितलं आहे. त्यामुळे यापुढे अशे चुकीचे वक्तव्य येणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ. सीमा प्रश्नाबाबतचा संदर्भ देताना आपल्याकडून अनावधानाने असं वक्तव्य बोललं गेलं आहे. आपला तसा कोणताही उद्देश नसल्याचं स्वतः गोगावले यांनी मला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितलं असल्याचं देखील केसरकर म्हणाले.