Kirit somaiya : किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला
खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवि राणा (Ravi Rana) यांची भेट घेऊन परत निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या (bjp leader kirit somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी (shiv sainiks) हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. रात्री १० वाजताच्या सुमारास सोमय्या जात असताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या आणि दगड भिरकावले. यात सोमय्या जखमी झाले. (shiv […]
ADVERTISEMENT
खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवि राणा (Ravi Rana) यांची भेट घेऊन परत निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या (bjp leader kirit somaiya) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी (shiv sainiks) हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. रात्री १० वाजताच्या सुमारास सोमय्या जात असताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या आणि दगड भिरकावले. यात सोमय्या जखमी झाले. (shiv sainik attacked on bjp leader kirit somaiya near Khar police station in mumbai)
ADVERTISEMENT
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याच्या भेटीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या खार पोलीस ठाण्यात गेले होते.
“कॅमेऱ्यांसमोर सांगतोय, शिवसेनेच्या नादाला लागायचं असेल, तर स्मशानात स्वतःच्या गोवऱ्या रचून या”
हे वाचलं का?
नवनीत राणा आणि रवि राणा यांची भेट घेतल्यानंतर किरीट सोमय्या आपल्या गाडीतून पोलीस ठाण्यातून बाहेर पडले. यावेळी तिथे असलेल्या शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्याचबरोबर पाण्याच्या बाटल्या आणि दगड त्यांच्या गाडीच्या दिशेनं फेकून मारले.
हल्ला झाला त्यावेळी किरीट सोमय्या गाडीच्या मधल्या सीटवर बसलेले होते. दगडामुळे गाडीच्या खिडकीची काच फुटली. तसेच किरीट सोमय्या यांनाही दुखापत झाली आहे. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्या गाडीतून तसेच पुढे निघून गेले. रात्री दहा वाजता खार पोलीस ठाण्याच्या बाहेर ही घटना घडली.
ADVERTISEMENT
नवनीत राणा, रवि राणांना अटक; ताब्यात घेताना खारमध्ये ‘हायव्होल्टेज ड्रामा’
ADVERTISEMENT
दरम्यान, या घटनेपूर्वी दिवसभरात मुख्यमंत्र्यांचं खासगी निवासस्थान मातोश्री आणि राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानाबाहेर तणावपूर्ण वातावरण होतं. मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठणाचं आव्हान देत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा शुक्रवारीच मुंबईत आले होते. त्यामुळे मुंबईत कालपासून राजकीय वातावरण तापलं होतं.
आज (२३ एप्रिल) सकाळी नऊ वाजता राणा दाम्पत्य मातोश्री वर जाणार होते. मात्र, पोलिसांनी त्यांना घरातून बाहेर पडण्यास मज्जाव केला. त्याचबरोबर शिवसैनिकांनीही त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली होती. दिवसभर हा गोंधळ सुरूच होता.
Navneet Rana: शिवसेनेला कायमच नडलेल्या नवनीत राणा आहेत तरी कोण?
खार पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताना किरीट सोमय्या यांचा वाहनावर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी शिवसैनिकांवर सोमय्यांनी आरोप केले आहेत.@KiritSomaiya #kiritsomaiya #shivsena #kharpolicestation pic.twitter.com/DgLoQ4S7T9
— Mumbai Tak (@mumbaitak) April 23, 2022
सायंकाळी नवनीत राणा आणि रवि राणा यांना पोलिसांनी त्यांच्या खार येथील घरातून ताब्यात घेतलं. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर कायदेशिर प्रक्रिया पुर्ण करत पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली. त्यांच्या अटकेनंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेले होते.
दोन रात्रीत, दोन हल्ले
शुक्रवारी रात्रीच भाजपचे मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. मातोश्रीबाहेरून जात असताना कलानगर जंक्शन येथे मोहित कंबोज यांच्या गाडीवर शुक्रवारी रात्री उशिरा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती.
हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप कंबोज यांच्याकडून करण्यात आला. तर कंबोज मातोश्रीची रेकी करण्यासाठी आले होते, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला. मात्र, सलग दोन रात्रीत मुंबईत भाजपच्या दोन नेत्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT